मुंबई, 7 एप्रिल: या आयपीएलमध्ये (IPL 2021) तीन नंबरवर कोण खेळणार? हा दिल्ली कॅपिटल्ससमोर प्रश्न आहे. दिल्लीचा नियमित कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीमचा कॅप्टन करण्यात आलंय. असं असलं तरी मागच्या सिझनमध्ये 519 रन करणाऱ्या श्रेयस अय्यरच्या जागेवर कोण खेळणार? हे कोडं कायम आहे.
दिल्लीकडं तिसऱ्या क्रमांकासाठी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे दोन अनुभवी बॅट्समन दावेदार आहेत. राजस्थान रॉयल्सचा माजी कॅप्टन असलेल्या स्मिथला दिल्लीनं 2.2 कोटींमध्ये खरेदी केलं आहे. स्मिथला खेळण्याची संधी मिळाली तर तो टॉप 3 मध्येच खेळणार असं दिल्ली कॅपिटल्सचे प्रमुख प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यानं स्पष्ट केलं.
स्मिथचा समावेश झाल्यानं टीमला फायदा होईल, असा दावा पॉन्टिंगनं केला आहे. "माझ्या मते ज्या फ्रँचायझीकडून तो इतका काळ खेळला त्यानं स्मिथला रिलीज केलं आहे. त्यामुळे यावेळी त्याची भूक आणखी वाढली असेल. त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली तर तो टॉप 3 मध्येच खेळेल. अर्थात त्याला संधी मिळाली तरच.. हे मी पुन्हा एकदा सांगतो," असं पॉन्टिंगनं स्पष्ट केलं. हे वर्ष आमच्यासाठी खूप चांगलं असेल असा विश्वासही त्यानं व्यक्त केला आहे.
दिल्लीकडून मागच्या सिझनमध्ये स्टॉईनिस, रबाडा, नॉर्किया आणि हेटमायर हे चार विदेशी खेळाडू खेळले होते. या सिझनमध्ये स्टॉईनिस, रबाडा आणि नॉर्किया यांची जागा निश्चित आहे. चौथ्या जागेसाठी हेटमायर आणि स्मिथमध्ये चुरस आहे. स्मिथ खेळणार का नाही, या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर पॉन्टिंगनं दिलेलं नाही.
(हे वाचा : 'त्यावेळी वाटलं आयुष्यात कशाचीही खात्री नाही', गांगुलीनं सांगितला 'तो' अनुभव!)
"मी काही दिवसांपूर्वीच स्मिथला भेटलो होतो. तो या सिझनमध्ये चांगला खेळ दाखवण्यासाठी उत्सुक आहे. स्मिथ खेळला नाही तरी त्याच्या सारखा खेळाडू टीमसोबत असणं हे फायदेशीर असेल असं पॉन्टिंगनं स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Delhi capitals, IPL 2021, Rishabh pant, Shreyas iyer