जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'त्यावेळी वाटलं आयुष्यात कशाचीही खात्री नाही', सौरव गांगुलीनं सांगितला 'तो' अनुभव!

'त्यावेळी वाटलं आयुष्यात कशाचीही खात्री नाही', सौरव गांगुलीनं सांगितला 'तो' अनुभव!

'त्यावेळी वाटलं आयुष्यात कशाचीही खात्री नाही', सौरव गांगुलीनं सांगितला 'तो' अनुभव!

सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाची विदेशात जिंकण्याची परंपरा सुरु झाली. टीम इंडियाच्या माजी कॅप्टनला देखील खराब काळ सहन करावा लागला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 7 एप्रिल: भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) चेहरा बदलणारा कॅप्टन अशी सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) ओळख आहे. गांगुलीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाची विदेशात जिंकण्याची परंपरा सुरु झाली. जी सध्या विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्त्वाखालीही सुरु आहे.  टीम इंडियाच्या माजी कॅप्टनला देखील त्याच्या करियरमध्ये खराब काळ सहन करावा लागला आहे. गांगुलीच्या मते, “2005 मध्ये कॅप्टनपदावरुन काढणे आणि त्यानंतर टीममधून वगळणे हा मोठा धक्का होता. त्यामुळे आयुष्यात कोणत्याही गोष्टीची खात्री देता येत नाही. तुम्ही कायम दबाव सहन करण्यासाठी सज्ज असलं पाहिजे,” असं मत गांगुलीनं व्यक्त केलं आहे. गांगुलीनं एका ऑनलाईन  प्रोमशनल इव्हेंटमध्ये गांगुलीनं सांगितलं कि, “तुम्हाला या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. हा तुमच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. खेळ, व्यवसाय किंवा आयुष्य कशाचीही खात्री नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी सज्ज राहवं लागेल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रेशर असतं. त्याला त्यावर मात करावी लगाते.” गांगुलीच्या कॅप्टनसीमध्ये भारतानं टेस्ट आणि वन-डे मिळून एकूण 196 मॅच खेळल्या. यामध्ये 97 मध्ये विजय मिळवला तर 79 मध्ये पराभव झाला. ‘खेळाडूंवर सतत दबाव असतो’ सौरव गांगुलीनं यावेळी खेळाडूंच्या मानसिकतेवरही मत व्यक्त केलं. “पहिली टेस्ट खेळल्यानंतर स्वत:ला सिद्ध करण्याचा दबाव असतो. त्याचबरोबर ही जागा आपल्यासाठी आहे हे जगाला दाखवून द्यायचं असतं. काही मॅच खेळल्यानंतर तुम्ही स्थिर होता. त्यावेळी खेळात सातत्य कायम ठेवण्याची धडपड सुरु होते. तुमच्या खेळात थोडीही चूक झाली तर लोकं टीका करु लागतात. हा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात बराच काळ चालणारा कालावधी असतो.” ( वाचा :  IPl 2021: देवदत्त पडिक्कलनंतर विराटच्या टीममधील आणखी एकाला कोरोना ) बीसीसीआय अध्यक्षांनी यावेळी बायो-बबलवर देखील मत व्यक्त केलं. “बराच काळ बायो-बबलमध्ये राहणं अवघड आहे. मात्र भारतीय खूप सहनशील असतात. तसंच ते प्रत्येक आव्हानासाठी सज्ज असतात. त्यामुळे आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंना फार त्रास होईल असं वाटत नाही. मी इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासह सर्व देशांच्या खेळाडूंसोबत खेळलो आहे. मला वाटतं कि, भारतीय खेळाडू  हे विदेशी खेळाडूपेक्षा मानसिक रित्या जास्त सक्षम आणि सहनशील आहेत.” असं गांगुलीनं स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात