Home /News /sport /

IPL 2022 : 11 कोटींच्या खेळाडूनं घालवली लाज, राजस्थान विरूद्ध केला नकोसा रेकॉर्ड

IPL 2022 : 11 कोटींच्या खेळाडूनं घालवली लाज, राजस्थान विरूद्ध केला नकोसा रेकॉर्ड

आयपीएल 2022 मध्ये चांगल्या सुरूवातीनंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) वाटचालीला ब्रेक लागला आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्ध (RCB vs RR) त्यांना 145 रनचं आव्हानही पूर्ण करता आलं नाही.

    मुंबई, 27 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये चांगल्या सुरूवातीनंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) वाटचालीला ब्रेक लागला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध आरसीबीची टीम फक्त 68 रनवर आऊट झाली होती. तर राजस्थान रॉयल्स विरूद्ध त्यांना 145 रनचं आव्हानही पूर्ण करता आलं नाही. सलग दुसऱ्या मॅचमध्ये आरसीबीच्या बॅटींगनं निराशा केलीय. राजस्थान विरूद्धच्या पराभवात आरसीबीच्या भरवशाच्या खेळाडूनं एक नकोसा रेकॉर्ड केला आहे. आरसीबीनं या ऑक्शनपूर्वी ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) रिटेन केले होते. आरसीबीनं त्याला रिटेन करण्यासाठी तब्बल 11 कोटींची किंमत मोजली. मॅक्सवेल राजस्थान विरूद्ध शून्यावर आऊट झाला. त्याला कुलदीप सेननं आऊट केलं. मॅक्सवेल आता आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट झालेला विदेशी खेळाडू बनला आहे. मॅक्सवेल आत्तापर्यंत एकूण 12 वेळा आयपीएल स्पर्धेत शून्यावर आऊट झाला आहे. त्यानं गुजरात टायटन्सकडून खेळणारा अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानला (Rashid Khan) मागं टाकलंय. राशिद आत्तापर्यंत 11 वेळा शून्यावर आऊट झालाय. त्याच्यानंतर सुनील नरीन आणि एबी डीव्हिलियर्स प्रत्येकी 10 वेळा तर ख्रिस मॉरीस आणि जॅक कॅलिस प्रत्येकी 9 वेळा शून्यावर आऊट झाले आहेत. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर आरसीबीने राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 144 रनवर रोखलं. रियान परागच्या (Riyan Parag) 31 बॉलमध्ये नाबाद 56 रनच्या खेळीमुळे राजस्थानला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. आरसीबीकडून सिराज, हेजलवूड, हसरंगा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर हर्षल पटेलला 1 विकेट घेण्यात यश आलं. रोहित शर्माच्या नशिबी विजय नाहीच, रात्रभर जागूनही आवडती टीम पराभूत 145 रनचं आव्हान पार करणंही आरसीबीला शक्य झालं नाही. 19.3 ओव्हरमध्ये 115 रनवरच आरसीबी ऑल आऊट झाली. फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) सर्वाधिक 23 रन केल्या. राजस्थानकडून कुलदीप सेनला (Kuldeep Sen) सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या, तर आर.अश्विनने 3 आणि प्रसिद्ध कृष्णाने 2 विकेट घेतल्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Glenn maxwell, Ipl 2022, Rajasthan Royals, RCB

    पुढील बातम्या