जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Cricket : टीम इंडियाचा स्टार खेळाडू झाला बागेश्वर बाबाचा भक्त

Cricket : टीम इंडियाचा स्टार खेळाडू झाला बागेश्वर बाबाचा भक्त

टीम इंडियाचा स्टार खेळाडू झाला बागेश्वर बाबाचा भक्त

टीम इंडियाचा स्टार खेळाडू झाला बागेश्वर बाबाचा भक्त

अनोळख्या लोकांचा भूतकाळ आणि भविष्य सांगणाऱ्या बागेश्वर धाम बाबाच्या चरणी टीम इंडियाचा गोलंदाज कुलदीप यादव नतमस्तक झाला आहे. कुलदीपने आपल्या कुटुंबासोबत बागेश्वर धाम येथे भेट दिली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

 मुंबई, 6 जुलै : अनोळख्या लोकांचा भूतकाळ आणि भविष्य सांगणाऱ्या बागेश्वर धाम बाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी छतरपूर जिल्ह्यातील  प्रसिद्ध बागेश्वर धाम  येथे देश विदेशातील अनेक भाविक येत असतात. 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान बागेश्वर धाम येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जात यात अनेक उद्योगपती, राजकारणी, अभिनेते इत्यादी मान्यवरांनी सहभाग घेऊन बाबाचा आशीर्वाद घेतला आहे. दरम्यान भारताचा स्टार गोलंदाज कुलदीप यादवने देखील बागेश्वर धामला भेट दिली असून तो बाबाच्या चरणी नतमस्तक झाला आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान 12 जुलै ते 25 जुलै दरम्यान टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. परंतु या टेस्ट सिरीजमध्ये भारतीय संघाचा भाग नसलेला गोलंदाज कुलदीप यादव हा 6 जुलै रोजी त्याच्या कुटुंबासोबत बागेश्वर धाम येथे पोहोचला. कुलदीप यादव पूर्वी बागेश्वर धामच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात खासदार आणि गायक मनोज तिवारी, गायिका गीता राबरी त्यांनी भेट दिली होती. क्रिकेटपटू कुलदीप यादव आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने बागेश्वर धामला जाऊन पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले.

News18

News18लोकमत
News18लोकमत

गोलंदाज कुलदीप यादवने बागेश्वर धामच्या प्राचीन मंदिरात पोहोचल्यानंतर त्याठिकाणी प्रथम पूजा केली, त्यानंतर त्याने त्याचा अर्ज नारळात बांधून बागेश्वर धाम येथील झाडावर बांधला. कुलदीप यादव याने पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना एक खास भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलदीप यादव स्टेजवर धीरेंद्र शास्त्रींच्या खुर्चीखाली बसल्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात