Home /News /sport /

BREAKING: क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याला मुंबईत घेतलं ताब्यात, हे कारण आलं समोर

BREAKING: क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याला मुंबईत घेतलं ताब्यात, हे कारण आलं समोर

क्रुणालची मुंबई डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

मुंबई, 12 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या (Indian Cricketer Krunal Pandya) याला मुंबई विमानतळावर डीआरआय (DRI) विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. आयपीएल (IPL 2020) खेळून यूएईमधून (UAE) मायदेशी आलेल्या क्रुणाल पांड्या याला ताब्यात घेतलं आहे. क्रुणालकडे सोन्याची दागिने, बांगड्या व इतर मौल्यवान, त्याचबरोबर महागडी मनगटी घड्याळे आढळून आले आहे. याबाबत क्रुणालची मुंबई डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईमुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हेही वाचा...'विराट आणि पॉंटिंगमध्ये झाली होती बाचाबाची', अश्विननं सांगितलं नेमकं काय घडलं आयपीएल (IPL2020) जिंकून मुंबई इंडियन्स संघाचा क्रिकेटपटू कृणाल पांड्या गुरुवारी दुबईहून भारतात परतला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर महसूल गुप्तचर विभागाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी कृणाल पांड्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोनं सापडलं. त्यानंतर DRI च्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, कृणाल पांड्या हा मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे. तो हार्दिक पांड्याचा थोरला भाऊ आहे. हार्दिक टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेला आहे. त्याचवेळी कृणाल आयपीएल संपल्यानंतर भारतात परतत होता. कृणाल हा डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज आहे. तो भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील खेळला आहे. त्यानं नोव्हेंबर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ऑल-राऊंडर कायरन पोलार्ड केलं होतं पांड्या बंधूंचं कौतुक... दरम्यान, आयपीएल (IPL 2020)च्या नुकत्याच झालेल्या मोसमामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाचा (Mumbai Indians) ऑल-राऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने टीममधल्या हार्दीक पांड्या (Hardik Pandya) आणि क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) या दोघांवर भाष्य केलं होतं. मुंबईनं ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये पोलार्ड दोन्ही पांड्या बंधूंसोबतच्या आपल्या ऑन-फिल्ड आणि ऑफ-फिल्ड समीकरणाबद्दलही तो बोलला होता. 'ते जसे आहेत तसे, ते दोघेही सर्वांना आवडतात. ते कोणालाही न आवडणं खूप कठीण आहे. हार्दिक आणि त्याचा आत्मविश्वास, काहीही असो, त्याचा आत्मविश्वास कायम असतो, तो नेहमी आनंदी असतो, तो नेहमीच सर्वांसाठी मदतीला उभा असतो, तो जबरदस्तच आहे. आणि दुसरीकडे क्रुणाल, जसं मी नेहमी म्हणतो, एक आहे हार्दिक पांड्या आणि दुसरा आहे स्मार्टर पांड्या. आमचं एकंदरीत असंच सगळं मजेशीर चालतं,' असं पोलार्ड या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. 'ते खूप मोकळ्या विचारांचे आणि जोरदार आहेत, पण ते फक्त ऑफ फिल्ड पुरतं नाही. जेव्हा ते क्रिकेटच्या मैदानावर जातात तेव्हाही ते जोरदार खेळतात, विशेषतः हार्दिक! तो जातो, तो दमदार खेळ दाखवत असतो, नेहमीच त्याचा आत्मविश्वास दिसतो. आमच्यात अनेक बाबतींत साम्य आहे,' असं पोलार्ड म्हणाला. हेही वाचा..5 IPL जिंकणाऱ्या रोहितलाच दिग्गज क्रिकेटपटूनं आपल्या IPL संघातून वगळलं! पोलार्ड सांगतो की मैदानाबाहेरचे त्यांचे हे संबंध मैदानावरही तसेच आहेत. ह्या त्रिकुटाचे ऑन फिल्डही अनेक भावनिक किस्से आहेत. पोलार्ड म्हणतो की त्यांच्यात एक समजूतदारपणा आहे जो खेळाताना, गंभीर चर्चा होत असताना दिसून येतो. 'जेव्हा आम्ही मैदानाबाहेर असतो तेव्हा सगळीकडे मज्जा मस्ती असते, पण मैदानात असताना आमच्यात सामन्याविषयी अनेकदा चर्चा होते. आम्ही एकमेकांचा आदर करतो आणि एकमेकांना समजून घेतो. हे सगळं आमच्यात चालतं,' असं पोलार्डने सांगितलं.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या