मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियाची स्टार फलंदाज jemimah rodrigues आता हॉकी स्टिकसह उतरणार मैदानात

टीम इंडियाची स्टार फलंदाज jemimah rodrigues आता हॉकी स्टिकसह उतरणार मैदानात

jemimah rodrigues

jemimah rodrigues

टीम इंडियाची आक्रमक फलंदाज जेमिमा रोड्रिग्‍स (jemimah rodrigues) आता हॉकी स्टिकसह मैदानात उतरणार आहे. ती लवकरच हॉकी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. भारतीय विश्वचषक संघात निवड न झाल्याने ती नाराज असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी: टीम इंडियाची आक्रमक फलंदाज जेमिमा रोड्रिग्‍स (jemimah rodrigues) आता हॉकी स्टिकसह मैदानात उतरणार आहे. ती लवकरच हॉकी स्पर्धेत खेळताना(Cricketer Jemimah to play rink hockey tournament) दिसणार आहे. भारतीय विश्वचषक संघात निवड न झाल्याने ती नाराज असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. त्यानंतर रॉड्रिग्सने हा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी, आयसीसी महिला वर्ल्डकप 2022 (ICC Women World Cup 2022) स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला. या वर्ल्डकप संघातून जेमिमाला वगळ्यात आले. तिने अलीकडेच इंग्लंडमधील द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीगमध्ये चमकदार खेळ सादर केला होता. त्यामुळे तीला संघातून बाहेर ठेवणे सर्वात आश्चर्यकारक बाब असल्याची चर्चा क्रिकेट जगतात सुरु आहे. दरम्यान, तिच्या हॉकी खेळण्याच्या निर्णयाने क्रिकेट जगतात चर्चेला उधाण आले आहे.

41 व्या होणाऱ्या या स्पर्धेत जेमिमा अंकल्स किचन युनायटेड स्पोर्ट्स संघाकडून खेळणार आहे. टीमने इन्स्टाग्रामवर जेमिमासोबतचे फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. या फोटोमध्ये ती भारतीय स्टार क्रिकेटपटू हॉकी स्टीकसोबत दिसत आहे.

ती मुंबईतील विलिंग्डन कॅथोलिक जिमखाना रिंक स्पर्धेत अंकल्स किचन युनायटेड स्पोर्ट्स संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

21 वर्षीय जेमिमाने भारतासाठी 21 एकदिवसीय आणि 50 टी-20 सामने खेळले असून, तिने 394 धावा आणि 1055 धावा केल्या आहेत. आता ती हॉकी स्टिकसह मैदानात उतरणार आहे.

जेमिमा जेव्हा सात- आठ वर्षी होती तेव्हापासून हॉकी खेळायची. शाळेत असताना ती हॉकी आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळत असे.भारतीय महिला संघाची धडाकेबाज फलंदाज 11 वर्षांची होती, तेव्हापासून तिने महाराष्ट्राच्या 17 वर्षांखालील हॉकी संघात खेळायला सुरुवात केली.

त्यानंतर मुंबईचा वेगळा संघ झाल्यावर ती मुंबई अंडर- 19 संघाकडून खेळली. तेव्हा ती हॉकीमध्ये करियर करेल, असे तिच्या पालकांना पूर्ण विश्वास होता. मात्र, नंतर तिला एक गोष्ट निवडावी लागली आणि तिने क्रिकेटची निवड केली.

भारताचा माजी गोलरक्षक एड्रियन डिसूझाही जेमिकाच्या हॉकी कौशल्याने आश्चर्यचकित झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त असूनही जेमिमा हॉकीला विसरलेली नाही हे पाहून बरे वाटते. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी, आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women World Cup 2022) स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरला विश्वचषकासाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

तसेच रिचा घोष आणि तानिया भाटिया यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. जेमिमा रॉड्रिग्ज, शिखा पांडे, हरलीन देओल, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती यांसारख्या चेहऱ्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकलेले नाही. जेमिमाची निवड न होणे हे सर्वात आश्चर्यकारक आहे. तिने अलीकडेच इंग्लंडमधील द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीगमध्ये चमकदार खेळ सादर केला होता.

First published:

Tags: Hockey, Team india