मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : 'आता बदल होणार', पराभवानंतर नाराज विराट कोहलीचा गंभीर इशारा

WTC Final : 'आता बदल होणार', पराभवानंतर नाराज विराट कोहलीचा गंभीर इशारा

टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या पराभवामुळे नाराज झाला आहे. त्याने या मॅचनंतर बोलताना टेस्ट टीममध्ये बदल करण्याचा इशारा दिला आहे.

टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या पराभवामुळे नाराज झाला आहे. त्याने या मॅचनंतर बोलताना टेस्ट टीममध्ये बदल करण्याचा इशारा दिला आहे.

टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या पराभवामुळे नाराज झाला आहे. त्याने या मॅचनंतर बोलताना टेस्ट टीममध्ये बदल करण्याचा इशारा दिला आहे.

साऊथम्पटन, 24 जून : टीम इंडियानं दोन वर्षांमध्ये सर्वात जास्त 12 टेस्ट जिंकत फायनलमध्ये (WTC Final) प्रवेश केला होता. विराट कोहलीची टीम न्यूझीलंडचा पराभव करुन विजेतेपद पटकावेल. गेल्या आठवर्षांपासून भारतीय फॅन्सना असणारी आयसीसी स्पर्धेच्या अजिंक्यपदाची प्रतीक्षा पूर्ण होईल, असा अनेकांचा अंदाज होता. प्रत्यक्षात साऊथम्पटनमध्ये झालेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं भारताचा 8 विकेट्सनं पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

कोहलीचा गंभीर इशारा

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली या पराभवामुळे नाराज झाला आहे. त्याने या मॅचनंतर बोलताना टेस्ट टीममध्ये बदल करण्याचा इशारा दिला आहे. "आम्ही आत्ममंथन करु. त्याचबरोबर टीमला मजबूत करण्यासाठी काय करावं याचा विचार केला जाईल. यासाठी एक वर्ष वाट पाहणार नाही. मर्यादीत ओव्हर्सच्या टीममध्ये आमच्याकडे अनेक पर्याय असून खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये देखील याची गरज आहे.

आम्हाला नव्यानं समीक्षा करावी लागेल. तसंच आमच्यासाठी काय चांगलं आहे, त्यानुसार प्लॅनिंग करावं लागेल. त्यासाठी योग्य व्यक्तींना आणण्याची गरज आहे. जे योग्य मानसिकतेसह चांगलं प्रदर्शन करतील." असा इशारा विराटनं दिला आहे.

'रन करावे लागतील'

टीम इंडियाच्या बॅट्समननं रन करण्यावर फोकस करावा लागेल, असा इशाराही विराटनं दिला आहे. "आमच्या बॅटींगच्या तंत्रामध्ये काही दोष आहे, असं मला वाटत नाही. रन करण्यावर आम्हाला काम करण्याची गरज आहे. पहिल्या दिवशी बॉल स्विंग झाला. त्यासारखी परिस्थिती नसेल तर बॉलर्सना खूप काळ एकाच जागी बॉलिंग करण्याची संधी देता कामा नये.

योग्य जोखीम घेणे आणि क्रिजवर पाय रोवून उभे राहणे यामध्ये संतुलन साधता आलं पाहिजे. विकेट गमावण्याची चिंता न करता रन काढण्यावर भर दिला पाहिजे. तरच प्रतिस्पर्धी टीमवर दबाव निर्माण होऊ शकेल." असे विराटने स्पष्ट केले.

टीम इंडियाला पराभूत केल्यानंतरही विल्यमसननं जिंकलं भारतीयांचं मन

विराटचा इशारा कुणाला?

विराटनं यावेळी कोणत्याही बॅट्समनचं नाव घेतलं नाही. पण त्याचा इशारा टीम इंडियाचा टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन चेतेश्वर पुजाराला  (Cheteshwar Pujara) असल्याचं मानलं जात आहे. पुजारानं पहिल्या इनिंगमध्ये 54 बॉलचा सामना करुन फक्त 8 रन काढले. पुजाराने खात उघडण्यासाठी  35 बॉल घेतले. तर दुसऱ्या इनिंगमध्ये 80 बॉलमध्ये 15 रन काढले. दोन्ही इनिंगमध्ये पुजारा भरपूर बॉल खेळल्यानंतर फार न काढता आऊट झाला. त्याचा दबाव अन्य बॅट्समनना सहन करावा लागला.

First published:

Tags: Cricket news, Virat kohli