जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final: विराटच्या सहकाऱ्यानं मोडला 72 वर्ष जुना रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच बॉलर

WTC Final: विराटच्या सहकाऱ्यानं मोडला 72 वर्ष जुना रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच बॉलर

WTC Final: विराटच्या सहकाऱ्यानं मोडला 72 वर्ष जुना रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच बॉलर

निसर्गाचा अडथळा येऊनही भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील फायनल मॅच (WTC Final) सध्या रंगतदार अवस्थेत आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याच्या सहकाऱ्यानं 72 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

साऊथम्पटन, 21 जून : निसर्गाचा अडथळा येऊनही भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील फायनल मॅच (WTC Final) सध्या रंगतदार अवस्थेत आहे. तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ उशीरा सुरु झाला. त्याचबरोबर खराब प्रकाशामुळे लवकर थांबवण्यात आला. खेळ थांबण्यापूर्वी झालेल्या सत्रामध्ये टीम इंडियानं दोन विकेट्स घेत भारतीय फॅन्सच्या आशा वाढवल्या आहेत. भारताच्या 217 धावसंख्येला उत्तर देताना न्यूझीलंडनं तिसऱ्या दिवसअखेरीस 2  आऊट 101 रन केले. दुसऱ्या दिवशी भारताने 3 आऊट 146 रनपासून पुढे सुरुवात केली. सकाळच्या सत्रात न्यूझीलंडच्या बॉलर्सनी जोरदार बॉलिंग करत वर्चस्व गाजवलं. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) आयपीएल टीममधील सहकारी काईल जेमिसनन (Kyle Jamieson) न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. जेमीसनने 31 रन देऊन पाच विकेट्स घेतल्या. कॅप्टन विराट कोहलीसह रोहित शर्मा, ऋषभ पंत, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह या पाच जणांना जेमीसननं आऊट केले. त्याच्या भेदक बॉलिंगमुळेच टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. जेमीसनचा नवा रेकॉर्ड जेमीसननं यावेळी 72 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला आहे. तो न्यूझीलंडकडून पहिल्या 8 टेस्टमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड जॅक कॉवीच्या नावावर होता. त्यांनी 1937 ते 1939 या कालावधीमध्ये 8 टेस्टमध्ये 41 विकेट्स घेतल्या होत्या. जेमीसनननं रविवारी आणखी एक रेकॉर्ड केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वात जास्त पाच वेळा एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेणारा बॉलर बनला आहे. त्याने जानेवारी 2020 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 8 टेस्टमध्येच ही कामगिरी केली आहे. क्रिकेट फॅन्ससाठी Good News! ICC च्या 3 मोठ्या स्पर्धा भारतात होणार? काईल जेमिसन हा आयपीएलमध्ये (IPL) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) खेळतो. आयपीएलमध्येही विराटने काईल जेमिसनला नेटमध्ये ड्युक बॉलने बॉलिंग करायला सांगितलं होतं, पण जेमिसनने विराटला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. आयपीएलच्या लिलावामध्ये विराटच्या आरसीबीने काईल जेमिसनवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते. जेमिसनला बँगलोरने तब्बल 15 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. काईल जेमिसनने याआधी 2019-2020 सालीही भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात विराट कोहली आणि टीम इंडियाला त्रास दिला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात