क्रिकेट फॅन्ससाठी Good News! ICC च्या 3 मोठ्या स्पर्धा भारतात होणार?

क्रिकेट फॅन्ससाठी Good News! ICC च्या 3 मोठ्या स्पर्धा भारतात होणार?

भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसीच्या (ICC) तीन मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) दावेदारी करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जून: भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) घेतला आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दर दोन वर्षांनी एक मोठी स्पर्धा आयोजित करण्याच्या आयसीसीच्या (ICC) निर्णयाला मान्यता दिल्यानंतर बीसीसीआयनं 2024 पासून सुरु होणाऱ्या क्रिकेट कॅलेंडरमधील तीन स्पर्धांच्या आयोजनासाठी दावेदारी करण्याचे ठरवले आहे.

कोणत्या स्पर्धा भारतामध्ये होणार?

आयसीसीच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार यावर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup 2021) यजमानपद बीसीसीआयकडे आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा देशाबाहेर होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी यजमान पदाचे सर्व अधिकार हे बीसीसीआयकडेच राहतील. त्याचबरोबर 2023 साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपचे (Cricket World Cup 2023) यजमानपद देखील बीसीसीआयकडे आहे.

बीसीसीआयनं आजवर एक टी 20 वर्ल्ड कप, एक चॅम्पियन्स ट्रॉफी आणि तीन वेळा क्रिकेट वर्ल्ड कपचं संयुक्त आयोजन केलं आहे. आगामी काळात दर तीन वर्षांनी या स्पर्धांचं आयोजन करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

बीसीसीआय 2025 साली होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी, 2028 साली होणारा T20 वर्ल्ड आणि 2031 साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या यजमानपदासाठी बीसीसीआय दावेदारी सादर करणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.

‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ

नुकसान भरपाईसाठी समितीची स्थापना

बीसीसीआयनं रणजी सिझन कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे रद्द केला आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यानं खेळाडूंना भरपाई देण्यासाठी 10 सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय बीसीसीआयनं या बैठकीत घेतला आहे. या समितीमध्ये सर्व झोनच्या सदस्यांसह बोर्डाचे चार अधिकाऱ्यांचा समावेश असेल. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हे देखील या समितीमध्ये असतील. रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द झाल्याचा फटका जवळपास 700 क्रिकेटपटूंना बसला आहे.

Published by: News18 Desk
First published: June 21, 2021, 8:41 AM IST

ताज्या बातम्या