साऊथम्पटन, 24 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्ध (India vs New Zealand) 8 विकेट्सनं पराभव झाला. फायनलच्या राखीव म्हणजेच अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 139 रनची गरज होती. न्यूझीलंडने ते आव्हान दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं (Kane Williamson) नाबाद अर्धशतक झळकावलं.
या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) काही चुका कबुल केल्या. पण, Playing 11 मध्ये काही चूक होती हे त्याने मान्य केलं नाही. टीम इंडिया ज्या 11 खेळाडूंसह फायनलमध्ये उतरली, त्याबाबत कोणताही पश्चाताप नसल्याचे विराटने सांगितले.
टीम इंडियाने फायनलच्या एक दिवस आधीच अंतिम 11 जणांची घोषणा केली होती. विराट त्यावर म्हणाला की, “फायनलच्या एक दिवस आधी आम्ही टीमची घोषणा केली याचा आम्हाला कोणताही पश्चाताप नाही. आम्हाला टीममध्ये एका ऑल राऊंडरची गरज होती. आम्ही आमची बेस्ट 11 खेळाडू मैदानात उतरवले होते.
Explainer: 55 लाख लोकसंख्येचा न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियन कसा बनला? जाणून घ्या 10 कारणं
टीम इंडिया कुठे चुकली?
विराट कोहलीच्या मते टीम इंडियाने 30 ते 40 रन कमी केले. “आम्ही चांगल्या टार्गेटपेक्षा 30 ते 40 रन कमी केले. बुधवारी सकाळी न्यूझीलंडच्या बॉलर्सनी योजनाबद्ध मारा केला. त्यांनी आम्हाला रन काढण्याची संधी दिली नाही. केन विल्यमसनच्या टीमनं चांगला खेळ केला. त्यामुळे फक्त 3 दिवसांमध्येच मॅचचा निकाल लागला. आम्ही पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॉलिंग केली होती.”
काईल जेमिसननमुळे मॅचमध्ये मोठा फरक पडल्याचे विराटने सांगितले. “जेमिसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जोरदार सुरुवात केली आहे. त्याने चांगली बॉलिंग आणि बॅटींग केली. त्याने या मॅचमध्ये सर्वोत्तम खेळ केला. त्यामुळे तोच ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारासाठी पात्र आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु करुन आयसीसीनं चांगले काम केले." असं विराट यावेळी म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Team india, Virat kohli