मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer: 55 लाख लोकसंख्येचा न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियन कसा बनला? जाणून घ्या 10 कारणं

Explainer: 55 लाख लोकसंख्येचा न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियन कसा बनला? जाणून घ्या 10 कारणं

क्रिकेट विश्वातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडने (New Zealand) सर्वाधिक लोकसंख्येच्या भारताचा (India) फायनलमध्ये (WTC Final) पराभव केला. न्यूझीलंडला हे कसं शक्य झालं? याची 10 प्रमूख कारणे पाहूया...

क्रिकेट विश्वातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडने (New Zealand) सर्वाधिक लोकसंख्येच्या भारताचा (India) फायनलमध्ये (WTC Final) पराभव केला. न्यूझीलंडला हे कसं शक्य झालं? याची 10 प्रमूख कारणे पाहूया...

क्रिकेट विश्वातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडने (New Zealand) सर्वाधिक लोकसंख्येच्या भारताचा (India) फायनलमध्ये (WTC Final) पराभव केला. न्यूझीलंडला हे कसं शक्य झालं? याची 10 प्रमूख कारणे पाहूया...

मुंबई, 24 जून : साऊथम्पटनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या 12 देशांमध्ये न्यूझीलंडची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजे 55 लाख आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या देशाने सर्वाधिक लोकसंख्येच्या भारताचा फायनलमध्ये पराभव केला. न्यूझीलंडला हे कसं शक्य झालं? याची 10 प्रमूख कारणे पाहूया...

दोन पराभवानंतरही जिद्द कायम

न्यूझीलंडचा 2015 आणि 2019 वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव झाला होता. 2015 साली ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला. तर 2019 साली इंग्लंड विरुद्धची फायनल टाय झाल्यानंतर फोरच्या नियमामुळे त्यांचे विजेतेपद हुकले. या दोन पराभवानंतरही न्यूझीलंडच्या खेळाडूंनी जिद्द सोडली नाही.

मोठे नाव नाहीत पण टीममध्ये आत्मविश्वास

न्यूझीलंडच्या टीममध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यासारखे मोठे खेळाडू नाहीत. पण, त्यांच्या टीम मॅनेजमेंटला खेळाडूंवर विश्वास आहे. फायनलपूर्वीच्या सीरिजमध्ये न्यूझीलंडनं डेवॉन कॉनवेला पहिल्यांदा संधी दिली. त्याने फायनलमध्ये अर्धशकतक झळकावले. युवा काईल जेमिसननं 7 विकेट्स घेतल्या. कॅप्टन विल्यमसननं दोन महत्त्वाच्या खेळी खेळल्या.

अनुभवी खेळाडूंवर विश्वास

न्यूझीलंडच्या टीममध्ये अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. लॉर्ड्समध्ये पदार्पणातच द्विशतक झळकावणारा डेवॉन कॉनवे 29 वर्षांचा आहे. त्याने मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतरच त्याला टेस्ट टीममध्ये संधी मिळाली.

बोर्डाकडून खेळाडूंना स्वातंत्र्य

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा वार्षिक महसूल 285 कोटी आहे. आयपीएल टीमला एका सिझनमधून इतका नफा मिळतो. त्यामुळे क्रिकेट बोर्ड खेळाडूंना जगभरातील अन्य क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची परवानगी देते. त्याचा फायदा खेळाडूंना होतो.

मैदानावर शांत खेळ

न्यूझीलंडचे खेळाडू मैदानात फारशी आक्रमकता दाखवत नाहीत. ते प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंना चिथावण्याचे काम करत नाहीत. शांतवृत्तीनं खेळणाऱ्या न्यूझीलंड टीमचे जगभरात फॅन्स आहेत.

WTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका

फायनलची भक्कम तयारी

न्यूझीलंडनं फायनलपूर्वी इंग्लंडमध्ये दोन टेस्ट मॅचची मालिका खेळली. त्यामुळे त्यांना इंग्लंडमधील हवामान आणि ड्यूक बॉलचा सराव झाला. टीम इंडियानं फायनलपूर्वी एकही सराव सामना खेळला नाही. भारतीय खेळाडू आयपीएलनंतर थेट टेस्ट मॅच खेळण्यासाठी उतरले.

देशांतर्गत क्रिकेटची व्यवस्था

न्यूझीलंडमध्ये देशांतर्गत क्रिकेटची व्यवस्था चांगली आहे. तेथील नॅशन अकादमीमध्ये मिळणाऱ्या सुविधा या भारतामधील एनसीएपेक्षा सरस आहेत. त्यामध्ये खेळाडूंच्या ट्रेनिंगसह दुखापतींवर विशेष लक्ष दिले जाते.

कमी आंतरराष्ट्रीय मॅचमुळे खेळाडू फ्रेश

न्यूझीलंडची टीम भारत किंवा ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते. त्यामुळे त्याचे खेळाडू अधिक फ्रेश आणि कमी दुखापतग्रस्त असतात. न्यूझीलंडनं गेल्या 3 वर्षांमध्ये  टीम इंडियापेक्षा 34 आंतरराष्ट्रीय मॅच कमी खेळल्या आहेत.

WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने इतिहास घडवला

वेगवेगळ्या लीगमध्ये खेळण्याचा फायदा

न्यूझीलंडचे खेळाडू जगभरातील लीगमध्ये क्रिकेट खेळतात. त्यामुळे त्यांना तेथील परिस्थितीचा सराव होतो. याचा फायदा न्यूझीलंडला फायनलमध्ये झाला. भारतीय खेळाडूंना विदेशात लीग खेळण्याची परवानगी नाही.

खेळाडूंवरील विश्वासाचे फायनलमध्ये फळ

न्यूझीलंडचा अनुभवी बॅट्समन रॉस टेलरनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत फक्त तीन अर्धशतक झळकावले आहेत. तरीही त्याला फायनलमध्ये संधी मिळली. टेलरनं दुसऱ्या इनिंगमध्ये 47 रनची महत्त्वाची खेळी केली. दुसरिकडं टीम इंडियानं दोन द्विशतक झळकावणाऱ्या मयंक अग्रवालचा टीममध्ये समावेश केला नाही.

First published:

Tags: Cricket, Explainer, New zealnad