जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final: ‘ही टीम नाही तर..’, फायनलमधील पराभवानंतर विराट कोहली भावुक

WTC Final: ‘ही टीम नाही तर..’, फायनलमधील पराभवानंतर विराट कोहली भावुक

WTC Final: ‘ही टीम नाही तर..’, फायनलमधील पराभवानंतर विराट कोहली भावुक

वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये (WTC Final) झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या प्रत्येक फॅन्ससह सर्व खेळाडू निराश झाले आहेत. कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) देखील त्याला अपवाद नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जून: वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये (WTC Final) झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या प्रत्येक फॅन्ससह सर्व खेळाडू निराश झाले आहेत. कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) देखील त्याला अपवाद नाही. विराटनं या पराभवानंतर एक भावुक करणारं ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने टीममधील सहकारी आणि फॅन्स यांना धीर दिला आहे. विराटनं गुरुवारी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये तो म्हणतो, “ही फक्त एक टीम नाही तर कुटुंब आहे. आम्ही सर्व जण एकत्र पुढे जाऊ.” या ट्विटमधून विराट सर्व खेळाडू आणि फॅन्सना धीर देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर फायनलमधील पराभव विसरुन आता पुढं जाण्याची वेळ आली आहे, असं आवाहन विराटला या ट्विटमधून करायचे आहे. टीम इंडियाला आता यजमान इंग्लंड विरुद्ध पाच कसोटींची मालिका खेळायची आहे. या मालिकेची सुरुवात 4 ऑगस्टपासून होईल. ही मालिका आगामी वर्ल्ड टेस्ट सीरिजचा भाग आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुढील वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये जायचं असेल तर ही मालिका जिंकणे आवश्यक आहे.

जाहिरात

तिसऱ्यांदा निराशा विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं संपूर्ण वर्ल्ड टेस्ट सीरिजमध्ये जोरदार कामगिरी केली होती. टीम इंडियानं सर्वाधिक पॉईंट्ससह फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण फायमलमध्ये त्यांना पुन्हा एकदा विजेतेपदानं हुलकावणी दिली. न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूची उडाली होती झोप, रात्रभर सतावत होती भीती विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं सलग तिसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी गमावली आहे. यापूर्वी कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीमचा 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पराभव झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात