Home /News /sport /

WTC Final : न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूची उडाली होती झोप, रात्रभर सतावत होती भीती

WTC Final : न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूची उडाली होती झोप, रात्रभर सतावत होती भीती

न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विजेतेपदामुळे न्यूझीलंडच्या दिग्गज क्रिकेटपटूची जुनी जखम ताजी झाली आहे.

    मुंबई, 25 जून : न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तब्बल 21 वर्षांनी न्यूझीलंडनं एखादी आयसीसीसीची स्पर्धा जिंकली आहे. या विजेतेपदामुळे न्यूझीलंडच्या दिग्गज क्रिकेटपटूची जुनी जखम ताजी झाली आहे. यापूर्वी दोन वन-डे वर्ल्ड कपमध्ये त्यांची टीम फायनलमध्ये येऊनही विजेतेपदापासून वंचित राहिली होती. आता यंदाही तसंच होईल या भीतीनं या दिग्गज क्रिकेटपटूची झोप उडाली होती. न्यूझीलंडचा माजी कॅप्टन ब्रँडन मॅकलम (Brendon McCullum) मैदानात नेहमी बिनधास्त फटकेबाजीसाठी ओळखला जात होता. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या (WTC Final)  दरम्यान मात्र तो घाबरला होता. मागील दोन वर्ल्ड कपची पुनरावृत्ती होण्याची त्याला भीती होती. अखेर सहाव्या दिवशी केन विल्यमसन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) जोडीनं न्यूझीलंडच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यावेळी तो कमालीचा आनंदी झाला. मॅकलमनं ‘सेन रेडिओ’ ला सांगितले की, “मागील काही वर्षांपासून चांगली कामगिरी केल्यानंतर टीम सर्वोच्च यश मिळवण्याच्या अगदी जवळ पोहचली होती. खेळातील मुख्य प्रकारात हे विजेतेपद पटकावणे खूप जबरदस्त आहे. पण खरं सांगायचं तर मला अजूनही त्यावर विश्वास बसत नाही. पाचव्या दिवशी लढत समसमान पातळीवर होती. त्यावेळी मला मागील दोन वर्ल्ड कपची आठवण येत होती. त्यावेळी आम्ही विजेतेपदाच्या जवळ जाऊनही ते पटकावू शकलो नाहीत. विराट कोहलीचा न्यूझीलंडमध्ये अपमान, गळ्यात टाकला पट्टा! पाहा Photo हवामानाचा अडथळा आणि मजबूत भारतीय टीम समोर असूनही आम्ही हे विजेतेपद पटकावले आहे. पुढील काळात आम्ही जेव्हा या उपलब्धीचा विचार करु तेव्हा त्याचा अभिमान वाटेल, अशी मला खात्री आहे. मर्यादीत साधनसंपत्ती असलेल्या देशासाठी हा मोठा क्षण आहे. क्रिकेट विश्वातील शक्तीशाली देशाच्या विरुद्ध सर्वात मोठ्या स्टेजवर मिळालेला हा विजय अधिक आनंद देणारा आहे.” असे मॅकलमनं यावेळी सांगितले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, New zealand

    पुढील बातम्या