जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final: टीम इंडियाच्या कोचचं Playing 11 बद्दल मोठं वक्तव्य!

WTC Final: टीम इंडियाच्या कोचचं Playing 11 बद्दल मोठं वक्तव्य!

WTC Final: टीम इंडियाच्या कोचचं Playing 11 बद्दल मोठं वक्तव्य!

साऊथम्पटनमधील हवामान आणि पिचचा विचार करता टीम इंडियानं Playing 11 मध्ये बदल करावा अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत टीम मॅनेजमेंटनं भूमिका स्पष्ट केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

साऊथम्पटन, 19 जून : साऊथम्पटनमधील हवामान आणि पिचचा विचार करता टीम इंडियानं Playing 11 मध्ये बदल करावा अशी मागणी करण्यात येत आहे. माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी देखील अश्विन आणि जडेजा यांच्यापैकी एकाला वगळून अतिरिक्त बॅट्समन खेळवावा अशी सूचना केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर (R. Sridhar) यांनी याबाबत टीम मॅनेजमेंटची भूमिका स्पष्ट केली आहे. “पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतरही टीममध्ये बदल होण्याची कोणतीही शक्यता नाही. सर्व परिस्थितीचा विचार करुन अंतिम 11 जणांची निवड करण्यात आली आहे, हे खेळाडू परिस्थिती अनुकूल करण्यासाठी समर्थ आहेत,” असे श्रीधर यांनी स्पष्ट केले. इंग्लंडमधील वातावरणात अचानक बदल होतो. या टेस्टच्या दरम्यान तापमान कमी राहण्याची आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे पहिला दिवस पाण्यात गेला. त्यानंतरही श्रीधर यांनी टीममध्ये बदल करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. श्रीधर यावेळी म्हणाले की, “माझ्या मते ही Playing 11 कोणत्याही पिचवर आणि परिस्थितीमध्ये चांगला खेळ करु शकते. जर आवश्यकता भासलीच तर निर्णय घेण्यात येईल. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाला याचा अर्थ गरज पडली तर सहाव्या दिवशी मॅच होऊ शकते. आयसीसीनं त्यांच्या अनुभवाच्या आधारावर हा निर्णय घेतला आहे. याची सर्वांना कल्पना आहे. प्रेक्षकांनाही मॅच पूर्ण पाहण्याची इच्छा आहे.” श्रीलंका दौऱ्यापूर्वी कॅप्टन धवन झाला ‘टॉप लेस’, गब्बरला पाहून रोहित म्हणाला… खेळाडूंबद्दल बोलताना श्रीधर यांनी सांगितले की, “इंग्लंड विरुद्धची सीरिज आणि आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर शुभमन गिल चांगला क्रिकेटपटू आहे. त्याच्या तंत्राबद्दल योग्य उत्तर मी नाही तर बॅटींग कोच विक्रम राठोड देऊ शकतात. शुभमननं माझ्या थ्रो डाऊनवर बॅटींग केली आहे. त्यावेळी तो चांगल्या लयीत खेळत होता. त्याला त्याच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात