जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final नंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, प्रमुख खेळाडू जखमी

WTC Final नंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, प्रमुख खेळाडू जखमी

WTC Final नंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, प्रमुख खेळाडू जखमी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) झालेल्या पराभवानंतर टीम इंडियासाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. भारतीय टीमच्या प्रमुख खेळाडूला दुखापत झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) झालेल्या पराभवानंतर टीम इंडियासाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर इशांत शर्माच्या (Ishant Sharma) बोटाची सर्जरी झाली आहे. इशांतच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना दुखापत झाली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज 4 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. पाच टेस्टच्या सीरिजपूर्वी इशांत फिट होईल अशी अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “इशांत न्यूझीलंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्याच्याच बॉलिंवर फिल्डिंग करताना जखमी झाला. त्याच्या दोन बोटांना दुखापत झाली. त्यावेळी त्याच्या बोटांमधून बरंच रक्त येत असल्यानं त्याला तातडीने मैदानाच्या बाहेर नेण्यात आले. इशांतच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना दुखापत झाली असून त्यावर टाके घालण्यात आले आहेत. ही दुखापत फार गंभीर नाही. तो येत्या 10 दिवसांमध्ये फिट होईल.” इशांतनं घेतल्या  3 विकेट्स न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या फायनल मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये इशांतनं तीन विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. फायनल मॅच संपल्यानंतर भारतीय टीम आता साऊथम्पटनहून लंडना रवाना झाली आहे. आता टीम इंडियाला बायो-बबलमधून तीन आठवड्यांचा ब्रेक देण्यात आला आहे.

News18

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन सपशेल अपयशी ठरले आहेत. अखेरच्या दिवशी टीम इंडियाची दुसरी इनिंग 170 रनवर संपुष्टात आली.  सहाव्या दिवशी सुरुवातीलाच काईल जेमिसनने भारताला विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या रुपात दोन धक्के दिले. यानंतर अजिंक्य रहाणेही लवकर माघारी परतला. ऋषभ पंतने 41 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर बोल्टला 3 विकेट मिळाल्या. काईल जेमिसनने 2 आणि नील वॅगनरने 1 विकेट घेतली. टीम इंडियासाठी सर्वात मोठा दिवस! आजच्याच दिवशी बदललं भारतीय क्रिकेट न्यूझीलंडला विजयासाठी 139 रनची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग केन विलियमसन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांनी नाबाद राहून केला. केन विलियमसन याने अर्धशतकी खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात