मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टीम इंडियासाठी सर्वात मोठा दिवस! आजच्याच दिवशी बदललं भारतीय क्रिकेट

टीम इंडियासाठी सर्वात मोठा दिवस! आजच्याच दिवशी बदललं भारतीय क्रिकेट

टीम इंडियासाठी (Team India) आजचा दिवस खास आहे. आजच्या दिवशी (25 जून 1983) रोजी भारतीय क्रिकेट टीमनं इतिहास घडवला. त्यामुळे देशातील क्रिकेटला संपूर्ण कलाटणी मिळाली.

टीम इंडियासाठी (Team India) आजचा दिवस खास आहे. आजच्या दिवशी (25 जून 1983) रोजी भारतीय क्रिकेट टीमनं इतिहास घडवला. त्यामुळे देशातील क्रिकेटला संपूर्ण कलाटणी मिळाली.

टीम इंडियासाठी (Team India) आजचा दिवस खास आहे. आजच्या दिवशी (25 जून 1983) रोजी भारतीय क्रिकेट टीमनं इतिहास घडवला. त्यामुळे देशातील क्रिकेटला संपूर्ण कलाटणी मिळाली.

मुंबई, 25 जून : एखाद्या खेळाडूच्या कारकिर्दीमध्ये किंवा टीमच्या इतिहासात एक असा दिवस  येतो ज्यामुळे त्यांच्यात पूर्ण बदल होतो. त्यांना आत्मविश्वास प्राप्त होतो. जगाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. नवोदीत खेळाडूचा महान होण्याचा किंवा सामान्य टीमचा बलाढ्य होण्याचा प्रवास त्या दिवसापासून सुरु होतो. टीम इंडियासाठी (Team India) आजचा दिवस खास आहे. आजच्या दिवशी (25 जून 1983) रोजी भारतीय क्रिकेट टीमनं इतिहास घडवला. त्यामुळे देशातील क्रिकेटला संपूर्ण कलाटणी मिळाली.

काय घडले होते आज?

कोणत्याही काळातील भारतीय क्रिकेट फॅन्सना कायम अभिमान वाटेल अशी घटना 25 जून 1983 रोजी घडली होती. इंग्लंडमध्ये झालेल्या तिसऱ्या वन-डे वर्ल्ड कप फायनलममध्ये कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय टीम दोन वेळेसच्या वर्ल्ड चॅम्पियन  क्लाईव्ह लॉईड (Clive Lloyd) यांच्या वेस्ट इंडिज टीमला धूळ चारत विजेतेपद पटकावले.

कुणालाही नव्हती अपेक्षा

1983 च्या वर्ल्ड़ कप विजेतेपदासाठी वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड हे दावेदार होते. भारतीय टीमनं यापूर्वीच्या दोन वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे तिसऱ्या वर्ल्ड कपमध्ये देखील ही टीम पहिल्या फेरीत बाद होईल असा सर्वांचा अंदाज होता. कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या त्या टीममध्ये अनेक तरुण ऑलराऊंडरचा समावेश होता. त्या टीमच्या मनात काही और होते.

टीम इंडियानं वर्ल्ड कपमधील पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा 34 रननं पराभव करत खळबळ उडवली होती. त्यानंतर कपिल देवनं झिम्बाब्वे विरुद्ध 175 रनची अविस्मरणीय खेळी करत टीमला विजय मिळवून दिला. सेमी फायनलमध्ये भारतीय टीमनं यजमान इंग्लंडचा 4 विकेट्सनं पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये पुन्हा एकदा वेस्ट इंडिजशी गाठ होती. भारतीय टीमनं संपूर्ण स्पर्धेत अविश्वसनीय खेळ केला असला तरी कुणीही ही टीम वेस्ट इंडिजला हरवून फायनल जिंकेल अशी अपेक्षा केली नव्हती.

फायनलमध्ये काय झाले?

वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलिंगसमोर भारतीय टीम फायनलमध्ये 183 रनवर ऑल आऊट झाली. भारताकडून श्रीकांतने सर्वात जास्त 38 रन काढले. 183 रनचं संरक्षण करण्याच्या निर्धारानं कपिल देवची टीम मैदानात उतरली. बलविंदर संधू यांनी ग्रिनिचला 1 रनवर आऊट करत टीमला दमदार सुरुवात करुन दिली.

व्हिव रिचर्ड आणि हेन्स यांची जमत असलेली जोडी मदनलालने फोडली. हेन्स आऊट झाला असला तरी रिचर्ड मैदानात होता. सेट झालेला रिचर्ड आऊट होईपर्यंत भारत वर्ल्ड कप जिंकू शकत नव्हता. त्याला आऊट करण्यासाठी काही तरी अफाट करण्याची गरज होती. त्यावेळी कॅप्टन कपिल देव टीमच्या मदतीला अक्षरश:  धावला. मदनलालच्या बॉलिंगवर कपिलनं मागे पळत जात रिचर्डचा भन्नाट कॅच घेतला.

" isDesktop="true" id="570108" >

WTC Final: टीम इंडियाच्या पराभवानंतर रवी शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया

रिचर्ड आऊट होणे हा वेस्ट इंडिजसाठी मोठा धक्का होता. त्या धक्क्यातून वर्ल्ड चॅम्पियन टीम सावरलीच नाही. भारताने वेस्ट इंडिजला 140 रनवर ऑल आऊट करत 43 रननं फायनल मॅच आणि वर्ल्ड कप जिंकला. या वर्ल्ड कप विजेतेपदामुळे भारतीय क्रिकेटला नवी चालना मिळाली. त्यानंतर पुढे जे घडले तो इतिहास सर्वांनाच माहिती आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, On this Day, West indies