मुंबई, 21 जून: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच सुरू आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (WI vs SA) यांचीही टेस्ट होत आहे. या मालिकेची दुसरी टेस्ट रंगतदार अवस्थेत आहे. दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजला विजयासाठी 324 रनचं लक्ष्य दिले आहे. वेस्ट इंडिजने या लक्ष्यचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस वेस्ट इंडिजने बिनबाद 15 रन काढले आहेत. वेस्ट इंडिजला उर्वरित दोन दिवसांमध्ये 309 रन करायचे आहेत. तसंच त्यांच्या आणखी सर्व 10 विकेट्स शिल्लक आहे. त्यामुळे या टेस्टचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. दोन टेस्टच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 नं आघाडीवर आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी रविवारी जेसन होल्डरनं (Jason Holder) स्लिपमध्ये जबरदस्त कॅच घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या इनिंगच्या 27 व्या ओव्हरमध्ये जायडन सिल्सचा बॉल केशव महाराजनं टोलावला होता. तो बॉल स्लिपमध्ये फिल्डिंग करत असलेल्या होल्डरनं लांब उंडी मारत एका हाताने पकडला. हा अविश्वसनीय कॅच घेतल्यानंतर होल्डरनं जोरदार सेलिब्रेशन केले.
Jason Holder, that is outrageous. 😱🙇♂️ pic.twitter.com/np8gcAkDP5
— Cricket on TNT Sports (@cricketontnt) June 20, 2021
दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या इनिंगमध्ये 298 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 174 रन काढले. वेस्ट इंडिजची पहिली इनिंग 149 वर संपुष्टात आली. या मालिकेत वेस्ट इंडिजला एकदाही 200 चा स्कोअर पार करता आलेला नाही. त्यामुळे त्यांना आता 324 रनचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी खेळ कमालीचा उंचवावा लागणार आहे. विराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral दक्षिण आफ्रिकेनं पहिली टेस्ट एक इनिंग आणि 63 रननं जिंकली होती. त्यापाठोपाठ आता ही टेस्ट जिंकून मालिका जिंकण्याचा आफ्रिकेचा प्रयत्न आहे.

)







