साऊथम्पटन, 19 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची (WTC Final 2021) संपूर्ण क्रिकेट विश्वात उत्सुकता आहे. या टेस्टचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. पहिल्या दिवशी पावसामुळे टॉस देखील झाला नाही. त्यामुळे सर्व क्रिकेट फॅन्सची निराशा झाली होती. आता या फॅन्स आणि खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे. शनिवारी सकाळी साऊथम्पटनमध्ये ऊन पडलं आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी फायनलला सुरूवात होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या या टेस्टमध्ये कॉमेंटेटरच्या भूमिकेत असलेल्या दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) याने मैदानाचा एक अपडेट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मैदानात ऊन पडलेलं दिसत आहे. इंग्लंडमधील वेळेनुसार शनिवारी सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी हा फोटो काढण्यात आला आहे. कार्तिकनं हा फोटो शेअर केल्यानं आता दुसऱ्या दिवशी वेळेवर मॅच सुरु होणार हे स्पष्ट झाले आहे.
Waking up to the sun ☀️#WTCFinal pic.twitter.com/ksizgYYwbB
— DK (@DineshKarthik) June 19, 2021
अर्धा तास लवकर सुरू होणार खेळ साऊथम्पटन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी अर्धा तास लवकर खेळ सुरु होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता मॅच सुरु होईल. पावसाचा अडथळा आला नाही तर एकूण 98 ओव्हर्सचा खेळ अपेक्षित आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये एका दिवशी 90 ओव्हर्सचा खेळ होतो. पण पहिला दिवस पावसानं वाया गेल्यानं आता उर्वरित दिवशी रोज 8 ओव्हर्स जास्त होतील. 28 तासांचा विमान प्रवास आणि धोनीची मनधरणी, रैनानं सांगितली Love Story हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुसऱ्या दिवशीही 70 टक्के पावसाची शक्यता आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत ऊन असेल. त्यानंतर हलक्या पावसाला सुरूवात होऊ शकते. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही पूर्ण खेळ होण्याची शक्यता कमी आहे. फायनलसाठी आयसीसीनं केलेल्या नियमानुसार या टेस्टसाठी सहावा दिवस म्हणजेच 23 जूनचा दिवस राखीव आहे. त्यामुळे पाचव्या दिवसाच्या खेळानंतर आवश्यकता भासल्यास सहाव्या दिवशी देखील मॅच खेळली जाऊ शकते. हा सामना जर ड्रॉ झाला तर दोन्ही टीमना विजयी घोषित करण्यात येईल, तसंच बक्षिसाची रक्कमही समसमान देण्यात येईल.