मुंबई, 19 जून : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) सध्या त्याच्या आत्मचरित्रासाठी चर्चेत आहे. रैनानं या पुस्तकात त्याच्या क्रिकेट करियरमधील अनेक चढ-उताराचं वर्णन केलं आहे. या पुस्तकच्या प्रमोशनसाठी The Lallantop ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रैनानं त्याच्या लव्ह स्टोरीचाही खुलासा केला आहे. सुरेश रैनाची आता पत्नी असलेल्या प्रियंकाला प्रपोज करण्यासाठी रैना ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडला गेला होता. विशेष म्हणजे त्यावेळी धोनीनं त्याला न जाण्याचा सल्ला दिला दिला होता. त्यानंतर रैनानं धोनीचं मन वळवलं आणि मोठा प्रवास करुन इंग्लंड गाठलं. धोनीचं मन वळवलं सुरेश रैनानं त्याच्या लव्हस्टोरीचा तो किस्सा सांगितला आहे. " भारतीय क्रिकेट टीम तेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. त्या दौऱ्यात टीम इंडियाला आठ दिवसांचा ब्रेक होता. त्या ब्रेकमध्ये खेळाडूंना हवं ते करण्याची संधी होती. मी या वेळेचा उपयोग करुन प्रियंकाला प्रपोज करण्यासाठी इंग्लंडला जाण्याचं ठरवलं. मी याबाबत माही भाईला सांगितले. त्यावर धोनीनं तू प्रियंकाला प्रपोज करण्यासाठी इंग्लंडला जात आहेस. विचार कर तुला नंतर दुसरी कुणी तरी मिळेल, असं म्हंटलं होतं. त्यानंतर मी धोनीचं मन वळवलं. माझ्याकडे ब्रिटनचा व्हिसा होता. मी बीसीसीआयची परवानगी घेतली. त्यावेळी आम्ही पर्थमध्ये होतो. मी प्रियंकाला प्रपोज करण्यासाठी पर्थ ते दुबई 16 तास आणि नंतर दुबई ते इंग्लंड 12 तास विमान प्रवास केला. WTC Final: टीम इंडियाच्या कोचचं Playing 11 बद्दल मोठं वक्तव्य! त्यावेळी विमान वेळेवर मिळालं नसतं तर माझ्या आजची कल्पना करवत नाही. खेळणं सोपं आहे, पण कोणत्याही मुलीला प्रपोज करणे अवघड. प्रपोज करताना कोणताही प्लॅन बी नसतो. त्यावेळी फक्त प्लॅन ए असतो आणि त्याचवर फोकस करावा लागतो." असे रैनाने सांगितले. सुरैश रैना आणि प्रियंकाचे 2015 साली लग्न झाले. त्यांना आता ग्रेसिया आणि रियो ही दोन मुलं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.