मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : ‘तो’ एक क्षण नडला, ऋषभ पंतचं धाडस टीम इंडियाच्या अंगलट

WTC Final : ‘तो’ एक क्षण नडला, ऋषभ पंतचं धाडस टीम इंडियाच्या अंगलट

टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडला मोठे टार्गेट देऊ शकली नाही, याचे मुख्य कारण ऋषभ पंतनं (Rishabh Pant) निर्णायक क्षणी केलेली चूक ठरली आहे.

टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडला मोठे टार्गेट देऊ शकली नाही, याचे मुख्य कारण ऋषभ पंतनं (Rishabh Pant) निर्णायक क्षणी केलेली चूक ठरली आहे.

टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडला मोठे टार्गेट देऊ शकली नाही, याचे मुख्य कारण ऋषभ पंतनं (Rishabh Pant) निर्णायक क्षणी केलेली चूक ठरली आहे.

साऊथम्पटन, 24 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. साऊथम्पटनमध्ये झालेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं भारतीय टीमचा 8 विकेट्सनं पराभव केला. टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी दिलेलं 139 रन्सचं टार्गेट न्यूझीलंडनं दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. हे टार्गेट अपुरं होतं, असं मत अनेक क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. टीम इंडिया मोठे टार्गेट देऊ शकली नाही, याचे मुख्य कारण ऋषभ पंतनं (Rishabh Pant) निर्णायक क्षणी केलेली चूक ठरली आहे.

पंतची सुरूवात आश्वासक

सहाव्या दिवशी टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 72 अशी होती तेव्हा पंत मैदानात उतरला. विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) पाठोपाठ बाद झाल्याने पंतवर दबाव होता. पंतनं त्यावेळी जबाबदारीनं खेळ करत अजिंक्य रहाणेसोबत 37 रनची छोटी पार्टनरशिप केली.

रहाणे आऊट झाल्यानंतर जडेजाच्या मदतीनं पंतनं आणखी प्रतिकार केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 33 रन जोडले. भारताचा स्कोअर 5 आऊट 142 असताना जडेजा आऊट झाला. त्याला वॅग्नरने आऊट केले. जडेजा आऊट झाल्यानंतर पंत आणि अश्विन ही शेवटची बॅटींग करु शकणारी जोडी मैदानात होती. तसंच टीम इंडियाकडं पुरेशी आघाडी नव्हती. त्यावेळी पंतनं अश्विनच्या साथीनं काही काळ शांत खेळणे आवश्यक होते.

WTC Final : विजेतेपदानंतर न्यूझीलंड मालामाल, टीम इंडियाचाही खिसा गरम!

‘तो’ मोह नडला

ऋषभ पंतनं अडचणीच्या क्षणी संयमी खेळ न करता त्याच्या नैसर्गिक खेळावर भर दिला. ट्रेंट बोल्टच्या (Trent Boult) बॉलवर मोठा फटका मारण्याचा मोह पंतला आवरला नाही. हेन्री निकोलसनं उत्तम कॅच घेत पंतला परत पाठवले. पंत 41 रनवर आऊट होताच न्यूझीलंडविरुद्ध 175-200 रनची आघाडी घेण्याची टीम इंडियाची योजना बारगळली. त्यानंतर भारतीय बॅट्समन फक्त 14 रन्सच करु शकले. ऋषभ पंतनं निर्णायक क्षणी केलेलं ते धाडस टीम इंडियाच्या अंगलट आले.

First published:

Tags: Cricket, Rishabh pant, Team india