जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Test Championship: दक्षिण आफ्रिकेची पॉईंट टेबलमध्ये झेप, पाहा टीम इंडियाचा कितवा नंबर

World Test Championship: दक्षिण आफ्रिकेची पॉईंट टेबलमध्ये झेप, पाहा टीम इंडियाचा कितवा नंबर

World Test Championship: दक्षिण आफ्रिकेची पॉईंट टेबलमध्ये झेप, पाहा टीम इंडियाचा कितवा नंबर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 7 विकेट्सनं विजय मिळवला आहे. या विजयाबरोबर आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी मारली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 7 विकेट्सनं पराभव झाला. या विजयानं यजमान टीमनं सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. त्याचबरोबर आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी मारली आहे. आफ्रिकेची टीम या आता थेट 5 व्या क्रमांकावर आली आहे. टीम इंडियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सिझनमध्ये 9 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये 4 मध्ये विजय मिळवला आहे तर 2 गमावल्या आहेत. टीम इंडिया सध्या चौथ्या क्रमांकावर कायम आहेय दक्षिण आफ्रिकेनं या सिझनमध्ये 2 मॅच खेळल्या असून त्यामध्ये त्यांनी एक विजय आणि एक पराजयाची त्यांच्या खात्यावर नोंद आहे. अ‍ॅशेस सीरिजमधील पहिल्या तीन टेस्ट मॅच जिंकून ऑस्ट्रेलिया टीम नंबर 1 वर कायम आहे. त्यांचे 36 पॉईंट्स आहेत. श्रीलंकेची टीम 24 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानची टीमचेही 36 पॉईंट्स असले तरी विजयाची टक्केवारी 75 टक्के असल्यानं ती टीम  तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडला पराभूत करणारी बांगलादेशची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांची विजयाची टक्केवारी 33.33 आहे.

जाहिरात

टीम इंडियाचा जोहान्सबर्गच्या मैदानावर टेस्टमध्ये पहिल्यांदाच पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 240 रनचे टार्गेट होते. ते त्यांनी 3  विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन  डीन एल्गार (Dean Elgar) विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने नाबाद 96 रन काढले. IND vs SA : राहुल पुन्हा ठरला चोकर कॅप्टन, T20 नंतर टेस्टमध्येही फेल टेम्बा बऊमा 23 रनवर नाबाद राहिला. रस्सी व्हॅन डर डुसेननेही 40 रनची, तर एडन मार्करमने 31 आणि कीगन पीटरसनने 28 रनची महत्त्वाची खेळी केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 3 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि आर.अश्विन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात