मुंबई, 6 मे: आयपीएल 2021 (IPL 2021) ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता टीम इंडियाला 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) स्पर्धेची फायनल खेळावी लागणार आहे. सध्या टीम इंडिया आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) पहिल्या तर न्यूझीलंडची टीम दुसऱ्या नंबरवर आहे. त्यामुळे ही फायनल जबरदस्त होण्याची शक्यता आहे. भारताकडं विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह, आर. अश्विन सारखे दिग्गज खेळाडू आहेत. तर न्यूझीलंडच्या टीममध्ये केन विल्यमसन, रॉस टेलर, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट हे अनुभवी खेळाडू आहेत.
रोहित शर्मानं (Rohit Sharma) इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत ज्या पद्धतीनं बॅटींग केली होती, ते पाहून त्याची निवड नक्की आहे. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांच्या जागा नक्की आहेत. तर ऑल राऊंडरच्या जागेसाठी रवींद्र जडेजाचं नाव सर्वात आघाडीवर आहे. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे फास्ट बॉलर्सच त्रिकूट टीममध्ये आहे. तर आर. अश्विनची जागा देखील निश्चित आहे. टीममधील 11 पैकी 10 जागा जवळपास निश्चित आहेत. त्याचवेळी एका जागा टीम मॅनेजमेंटच्या चिंतेचा विषय आहे.
अनुभवी खेळाडूचं पुनरागमन
रोहित शर्माचा ओपनिंग जोडीदार शुभमन गिल (Shubman Gill) सध्या फॉर्मात नाही. त्यानं इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत फक्त 19.80 च्या सरासरीनं 119 रन काढले. त्याचा खराब फॉर्म आयपीएल 2021 मध्येही कायम होता. केकेआरकडून खेळताना गिलनं सात मॅचमध्ये 18.85 च्या सरासरीनं 132 रन काढले आहेत. त्या परिस्थितीत गिलच्या जागेसाठी अनुभवी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्यात चुरस आहे.
धवननं या आयपीएल सिझनमधील आठ मॅचमध्ये 54.28 च्या सरासरीनं सर्वात जास्त 380 रन काढले. तर पृथ्वी शॉनं आठ मॅचमध्ये 166.48 च्या स्ट्राईक रेटनं 308 रन काढले आहेत. धवन आणि पृथ्वी दोघांनीही प्रत्येकी तीन अर्धशतक झळकावली आहेत.
IPL 2021: आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर गांगुलीची प्रतिक्रिया, म्हणाला...
भारताचा अनुभवी बॅट्समन असलेला शिखर धवन 2018 पासून टेस्ट टीममधून बाहेर आहे. त्यावर्षी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील खराब कामगिरीमुळे धवनची जागा गेली होती. धवननं 34 टेस्टमध्ये 40.61 च्या सरासरीनं 2315 रन काढले आहेत. त्यामध्ये सात शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. शिखर धवनचा अनुभव आणि रोहित शर्मासोबतचा त्याचा चांगला रेकॉर्ड लक्षात घेऊन धवन फायनलमध्ये खेळण्याची शक्यता जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Icc, IPL 2021, Prithvi Shaw, Shikhar dhavan, Sports, Team india