बर्मिंगहम, 01 जुलै : ICC Cricket World Cup 2019 स्पर्धेत भारतीय संघाला दुखापतीने ग्रासलं आहे. आतापर्यंत दोन खेळाडूंना दुखापतीने वर्ल्ड कपला मुकावं लागलं आहे. तर दोन खेळाडू जखमी आहेत. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना ऐनवेळी संघातील खेळाडूंच्या दुखापतीने डोकं वर काढलं आहे. पहिल्यांदा शिखर धवन बाहेर गेला त्याच्या जागी ऋषभ पंत आणि त्यानंतर विजय शंकरच्या जागी मयंक अग्रवालला संघात घेतलं आहे. विजय शंकरच्या जागी मयंक अग्रवालला घेण्यात आलं आहे. गेल्या वर्षी भारतीय संघात निवड झालेल्या मयंकला अंतिम 15 मध्ये स्थान दिलं आहे. त्याला कशाच्या आधारावर संघात घेतलं असाही सवाल सोशल मिडियावर विचारला जात आहे. त्याचापेक्षा जास्त प्रतिभावान खेळाडू संघात आहेत. अजिंक्य रहाणेचं गेल्या 10 एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड पाहता तोच संघात योग्य आहे असंही क्रिकेटप्रेमींचं म्हणणं आहे. मयंक अग्रवाल एकही एकदिवसीय सामना खेळला नसताना त्याला घेतला मग अजिंक्य रहाणे निवृत्त झाला काय? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेनं 13 सामन्यात 137 च्या स्ट्राईक रेटनं 393 धावा केल्या आहेत. याबाबतीत त्यानं रोहित शर्मा, केएल राहुल आणि धोनीलाही मागं टाकलं आहे. अजिंक्य रहाणेला 90 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असून त्याने गेल्या 10 सामन्यात 61, 53, 70, 55, 5, 5, 39, 60, 72 आणि 103 धावा काढल्या आहेत. 52.30 च्या सरासरीनं त्यानं 523 धावा केल्या असतानाही त्याची निवड न होणं धक्कादायक होतं. आता पुन्हा बीसीसीआयनं विजय शंकर बाहेर पडल्यानंतर रहाणेचा विचार करायला हवा होता असं म्हटलं आहे.
last 10 ODI Innings of Ajinkya rahane 61, 53, 70, 55, 5, 5, 39, 60, 72 and 103. A total of 523 runs at an average of 52.30.still he was not selected for WC can you tell me @BCCI the reason behind not selecting @ajinkyarahane88 for plece of @vijayshankar260 who ruled out to WC. pic.twitter.com/I9RAU9nURD
— Kushal Thakur (@ImKushal27) July 1, 2019
वर्ल्ड कपमध्ये भारत सर्वात बलाढ्य संघ समजला जात असला तरी काही कमकुवत बाजू आता समोर येत आहेत. त्यामध्ये अफगाणिस्तानसारख्या संघाने फलंदाजांची केलेली दमछाक. तसेच इंग्लंडसमोर धावांसाठी धडपडत असलेली मधली फळी भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या चार वर्षात चौथ्या क्रमांकावर भारताला एकही भरवशाचा फलंदाज मिळालेला नाही. वर्ल्ड कपमध्येही भारताने केएल राहुल, पांड्या, विजय शंकर आणि रिषभ पंतला खेळवून प्रयोग केला. आता ऋषभ पंतला पुढच्या सामन्यात संधी दिली नाही तर संघात कोणाला स्थान द्यायचं असाही प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर असेल.
भारताने इंग्लंडविरुद्धचा सामना वगळता इतर सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताला अफगाणिस्तानने जबरदस्त झुंज दिली. स्पर्धेत भारताच्या गोलंदाजांनी आणि आघाडीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी मधल्या फळीची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विजय शंकर, धोनी, केदार जाधव यांच्या खेळीवरून टीकाही होत आहे. संघाकडे दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा यांच्यासारखे दबावात खेळलेले अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना संधी द्यायला हवी अशी चर्चा आता सर्वत्र होताना दिसतं आहे. याशिवाय संघात निवड न झालेल्या पण क्षमता असलेल्या खेळाडूंची नावेही चर्चेत आहेत. त्यामध्ये अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू यांची नावे आघाडीवर आहेत. या दोघांना संधी मिळेल असं म्हटलं जात होतं. मात्र, दोघांचीही अंतिम 15 मध्ये निवड झाली नाही.
सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यानंतर पंतला इंग्लंडमध्ये बोलावून घेण्यात आलं. धवनच्या जागी संघात विजय शंकरची वर्णी लागली. मात्र, त्याला फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. तसेच पाकिस्तानविरुद्ध वगळता शंकरला गोलंदाजीसुद्धा दिली नाही. तेव्हा त्याच्या कामगिरीवरून शंकर म्हणजे कोहलीसारखा गोलंदाज आणि बुमराहसारखा फलंदाज अशी टीका नेटकऱ्यांनी केली.
आता विजय शंकरच दुखापतीने वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. विजयच्या जागी ऋषभ पंतला अंतिम 11 मध्ये घेतलं गेलं. इंग्लंडविरुद्ध त्याने वर्ल्ड कपमधील पदार्पणाच्या सामन्यात 29 चेंडूत 32 धावा केल्या. त्याने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याचाही खेळीवर सोशल मिडियावर टीका केली जात आहे. अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्येच काउंटी क्रिकेट खेळत आहे. यात त्याने एक शतक आणि अर्धशतक केलं आहे. त्यामुळं तिथली परिस्थिती त्याला अनुकूल अशीच असेल. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये रहाणे संघात होता. त्याला दबावात खेळण्याचा अनुभव आहे. तसेच मधल्या फळीसह सलामीलासुद्धा खेळू शकतो. तरीही त्याला संधी न दिल्यानं चाहत्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. World Cup : धोनीवर भडकले दिग्गज, विराटने केली पाठराखण! World Cup : भारताच्या पराभवाला या 11 गोष्टी ठरल्या कारणीभूत! ‘तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग’; रोहितनं केली बोलती बंद World Cup : सेमीफायनलचा गुंता वाढला, भारतही होऊ शकतो वर्ल्ड कपच्या बाहेर VIRAL FACT: सरकारने वारकऱ्यांना साडेपाच लाख रेनकोट वाटले का?