World Cup IND vs ENG : भारताच्या पराभवाला या 11 गोष्टी ठरल्या कारणीभूत!

World Cup IND vs ENG : भारताच्या पराभवाला या 11 गोष्टी ठरल्या कारणीभूत!

ICC Cricket World Cup भारताविरुद्ध संघ निवडण्यापासून ते मैदानावरील कामगिरीपर्यंत इंग्लंडनं बाजी मारली.

  • Share this:

बर्मिंगहम, 30 जून : पहिल्या पाच सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयरथाला इंग्लंडने ब्रेक लावला आहे. या पराभवाने भारताचा सेमीफायनल प्रवेश लांबला आहे. 7 पैकी 5 सामने जिंकून भारताने 11 गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करणाऱ्या भारताला इंग्लंडविरुद्ध मात्र पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत आतपर्यंत एकही सामना न गमावलेल्या भारताला इंग्लंडने पराभूत करून सेमीफायनलच्या दिशेन एक पाऊल टाकलं आहे.

नाणेफेक इंग्लंडच्या बाजूने

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इथंच त्यांनी अर्धी लढाई जिंकली होती. नाणेफेकीनंतर विराटसुद्धा म्हटला की, आम्हीही फलंदाजीच घेतली असती. भारताने पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग करून विजय मिळवला होता. त्यानंतर सर्व सामन्यात प्रथम फलंदाजी केली आहे.

वेगवान गोलंदाजांनी राखलं, फिरकीपटूंनी उधळलं

गोलंदाजीत भारताकडून एकट्या शमीने यजमानांचा निम्मा संघ तंबूत धाडला. तर बुमराह आणि कुलदीप यादवने एक बळी घेतला. शमी आणि बुमराह वगळता इतर गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली. युझवेंद्र चहल आतापर्यंत वर्ल्ड कपमधील भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत तब्बल 88 धावांची खैरात केली. त्याच्याशिवाय कुलदीप यादवनेसुद्धा 72 धावा दिल्या.

सलामीवीरांचं योगदान ठरलं महत्त्वाचं

भारताला पहिल्यांदाच सलामीची जोडी फोडण्यात अपयश आले. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध पहिल्या गड्यासाठी सर्वात मोठी भागिदारी जेसन रॉय आणि बेअरस्टोनं केली. याच्या जोरावरच इंग्लंडने भारतासमोर 338 धावांचे आव्हान ठेवलं.

जेसन रॉयचं जीवदान महागात

जेसन रॉय 21 धावांवर असताना डीआरएस न घेण्याचा निर्णय भारताला महागात पडला. जेसन रॉय तेव्हा बाद झाला असता तर कदाचित इंग्लंडवर दबाव टाकण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी झाले असते.

फिरकीपटूंचे अपयश

भारताचे फिरकीपटू आजच्या सामन्यात चालले नाहीत. चहल आणि कुलदीप यादव या दोघांनी मिळून 160 धावा दिल्या. हार्दिक पांड्याने 6 च्या सरासरीने धावा दिल्या.

प्लेइंग इलेव्हन

आजच्या सामन्यात भारताने विजय शंकरच्या जागी ऋषभ पंतला संघात घेतलं. तर इंग्लंडने फिरकीपटू मोईन अलीला विश्रांती दिली. त्याच्या जागी लियाम प्लंकेट या वेगवान गोलंदाजाला संघात घेतलं. त्याने भारताच्या मधल्या फळीला खिंडार पाडत तीन गडी बाद केले.

दुखापतीचा दणका

भारतीय संघाच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. सलामीवीर शिखर धवन स्पर्धेला मुकला आहे. त्याच्यापाठोपाठ सध्या भुवनेश्वर कुमारच्या पायाचे स्नायु दुखावल्यानं दोन सामन्यात खेळू शकला नाही. तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला दुखापत झाली. तो क्षेत्ररक्षण करू शकला नाही. त्यानंतर फलंदाजीत त्याला भोपळाही फोडता आला नाही.

ख्रिस वोस्कचा टिच्चून मारा

भारताच्या फलंदाजांना जखडून ठेवण्याची कामगिरी इंग्लंडने केली. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सनं सलग तीन षटके निर्धाव टाकली. यामुळे सलामीच्या फलंदाजांवर दबाव आला. यात त्याने एक विकेटही घेतली. वोक्स, प्लंकेट, आर्चर यांनी टिच्चून मारा करत भारताच्या धावगतीला लगाम घातला.

मधली फळी कमकुवत

भारताच्या मधल्या फळीचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे. गेल्या सहा सामन्यात भारताने चौथ्या क्रमांकावर चार खेळाडूंना खेळवलं आहे. यात एकदा केएल राहुल, हार्दिक पांड्या, पंत खेळले आहेत. तर दोन वेळा विजय शंकर खेळला आहे. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आलेली नाही.

कॅचेस विन मॅचेस

इंग्लंडकडून लियाम प्लंकेटनं तीन तर ख्रिस वोक्सन दोन विकेट घेतल्या. भारताचे पाचही फलंदाज खराब फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाले. भारताकडून जेसन रॉयचा झेल सुटला. इंग्लंडनेही काही संधी गमावल्या मात्र गोलंदाजांनी वर्चस्व राखत भारताच्या फंलदाजांन जखडून ठेवलं.

पंतची घाई

पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या पंतने खेळताना घाई केली. पंत तीन चेंडूत दोनवेळा धावबाद होण्यापासून वाचला. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने 29 चेंडूत 32 धावा केल्या.

SPECIAL REPORT : आंटी मत कहो ना ! चुकून म्हणालातच तर...

First published: July 1, 2019, 7:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading