जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's World Cup, IND vs AUS : वर्ल्ड कपवर मितालीचंच 'राज', दमदार कमबॅकसह केला नवा रेकॉर्ड

Women's World Cup, IND vs AUS : वर्ल्ड कपवर मितालीचंच 'राज', दमदार कमबॅकसह केला नवा रेकॉर्ड

Women's World Cup, IND vs AUS : वर्ल्ड कपवर मितालीचंच 'राज', दमदार कमबॅकसह केला नवा रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजसाठी (Mithali Raj) रेकॉर्ड ही नवी गोष्ट नाही. मितालीनं तिच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च : भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजसाठी (Mithali Raj) रेकॉर्ड ही नवी गोष्ट नाही.  मितालीनं तिच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत. ती यंदा सहावा वर्ल्ड कप खेळत आहे. सहा वर्ल्ड कप खेळणारी मिताली ही एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मॅचमध्ये (India Women vs Australia Women) मॅचमध्ये मितालीनं आणखी एका रेकॉर्डची नोंद केली आहे. मितालीसाठी या वर्ल्ड कपची सुरूवात खराब झाली होती. या वर्ल्ड कपमधील चार इनिंगमध्ये 11.50 च्या सरासरीनं फक्त 46 रन केले आहेत.  काळजीची गोष्ट म्हणजे चारपैकी तीन इनिंगमध्ये तिला दोन अंकी रनही करता आले नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मॅचमध्ये बॅटींगला उतरताना मितालीवर दबाव होता.

जाहिरात

टीम इंडियाची 2 आऊट 28 अशी धावसंख्या होती तेव्हा मिताली बॅटीगला आली. यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) सोबत तिने तिसऱ्या विकेटसाठी 130 रनची भागिदारी केली. यावेळी मितालीनं तिचा सर्व अनुभव पणाला लावत अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाबरोबरच एका खास रेकॉर्डची नोंद तिच्या नावावर झाली. Glenn Maxell चा भारतीय Vini Raman शी झाला साखरपुडा, पाहा Photo मितालीनं ऑस्ट्रेलिया विरूद्ध 96 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 68 रन केले. हे तिचं या वर्ल्ड कपमधील पहिलं अर्धशतक होतं. तर वर्ल्ड कप स्पर्धेतील 12 वं अर्धशतक होतं. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या न्यूझीलंडच्या डर्बी हॉकलेच्या रेकॉर्डची मितालीनं बरोबरी केली आहे. यापूर्वी ती इंग्लंडच्या सी. एडवर्डसह दुसऱ्या क्रमांकावर होती. एडवर्डनं वर्ल्ड कपमध्ये 11 अर्धशतर झळकावले आहेत. आता मितालीला या वर्ल्ड कपमधील उर्वरित मॅचमध्ये हॉकलेला मागं टाकण्याची संधी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात