मुंबई, 19 मार्च : आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) आता आठवडाभरावर आला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) यांच्या मॅचनं या स्पर्धेला सुरूवात होईल. यंदाच्या सिझनमध्ये 10 टीम खेळणार आहेत. सर्वच टीमनं स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. बहुतेक प्रमुख खेळाडू आता बायो-बबलमध्ये दाखल झाले आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) टीमच्या प्रमुख खेळाडूनं साखरपुडा (Engagement) केली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि आरसीबीचा आक्रमक ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) त्याची भारतीय गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) सोबत मेलबर्नमध्ये साखरपुडा झाला आहे. ही दोघं गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांचं 27 मार्च रोजी लग्न होणार आहे. या साखरपुड्याचा खास फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आरसीबीनंही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मॅक्सवेल आणि विनीचं अभिनंदन केलं असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
The RCB family is incredibly happy for @vini_raman and @Gmaxi_32 on the beginning of this new chapter in their lives.
Wishing you both all the happiness and peace, Maxi! ❤️ pic.twitter.com/RxUimi3MeX — Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 19, 2022
कोण आहे विनी?
भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये स्थायिक झाली आहे. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार ती फार्मासिस्ट आहे. मॅक्सवेल आणि विनी बराच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली मॅक्सवेलनं मानसिक कारणामुळे क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. त्यावेळी विनीनं त्याला वाईट कालखंडातून बाहेर काढलं असा खुलासा मॅक्सवेलनंच केला होता.
IND vs AUS : भारतीय खेळाडूनं लगावला वर्ल्ड कपमधील सर्वात लांब SIX, पाहा VIDEO
मॅक्सवेलनं मागील आयपीएल सिझनमध्ये जोरदार कामगिरी केली. पण त्याची आरसीबी टीम आयपीएल फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरली. यंदाच्या आयपीएलसाठी मॅक्सवेलला आरसीबीनं रिटेन केले होते. तो या लग्नामुळे ऑस्ट्रेलियन टीमसोबत पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाही. तसंच आयपीएल स्पर्धेतील सुरूवातीचे सामने देखील खेळणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Glenn maxwell, Ipl 2022, RCB, Trending photo