मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Women's World Cup: इंग्लंडच्या कॅप्टननं केली गांगुलीसारखी चूक, सचिनसारखं होणार स्वप्न भंग!

Women's World Cup: इंग्लंडच्या कॅप्टननं केली गांगुलीसारखी चूक, सचिनसारखं होणार स्वप्न भंग!

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये (Women's World Cup 2022) इंग्लंडची कॅप्टन हेथर नाईटनं (Heather Knight) सौरव गांगुलीसारखी चूक केली आहे.

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये (Women's World Cup 2022) इंग्लंडची कॅप्टन हेथर नाईटनं (Heather Knight) सौरव गांगुलीसारखी चूक केली आहे.

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये (Women's World Cup 2022) इंग्लंडची कॅप्टन हेथर नाईटनं (Heather Knight) सौरव गांगुलीसारखी चूक केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 फेब्रुवारी : टीम इंडियानं आजवर दोन वेळा वन-डे वर्ल्ड कप जिंकलाय. त्याचवेळी त्यांनी 2003 साली वर्ल्ड कप जिंकण्याची मोठी संधी गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या त्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम जबरदस्त फॉर्मात होती. सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या त्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू होते. त्यानंतरही भारतीय टीम फायनलमध्ये पराभूत झाली. या पराभवाचं कारण तुम्हाला माहिती आहे का?

गांगुलीची चूक नडली

2003 वर्ल्ड कप फायनल खेळलेली टीम इंडिया चॅम्पियन ऑस्ट्रेलियापेक्षा कुठंही कमी नव्हती. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) जबरदस्त फॉर्मात होता. त्याला द्रविड, सेहवाग यांची साथ होती. स्वत: गांगुलीनं वर्ल्ड कपमध्ये 2 शतक झळकावली होती. युवराज-कैफ या तरूण खेळाडूंमध्ये कोणतंही अवघड आव्हान पेलण्याची धमक होती. तरीही भारतीय टीम फायनलमध्ये एकतर्फी पराभूत झाली. दुर्दैवाची बाब म्हणजे टीम इंडियाचा हा पराभव मॅचमधील पहिला बॉल पडण्यापूर्वीच निश्चित झाला होता. कॅप्टन सौरव गांगुलीनं केलेल्या चुकीची मोठी किंमत भारतीय टीमला मोजावी लागली.

जोहान्सबर्गमध्ये झालेल्या त्या फायनलमध्ये सौरव गांगुलीनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. वर्ल्ड कप फायनलसारख्या हाय प्रेशर मॅचमध्ये टॉस जिंकल्यावर पहिल्यांदा बॅटींग घ्यावी असं मत अनेक माजी क्रिकेटपटू तसंच क्रिकेट तज्ज्ञ नेहमी व्यक्त करतात. गांगुलीलाही तसा सल्ला देण्यात आला होता. पण दादानं त्यांचा सल्ला ऐकला नाही. ऑस्ट्रेलियन टीमनं सुरूवातीला बॅटींग करत अनुकूल वातावरणाचा फायदा उठवला. रिकी पॉन्टिंगच्या आक्रमक शतकामुळे ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत 2 आऊट 359 रन केले. टीम इंडियाला 360 रनचं आव्हान पेलवलं नाही. भारतीय टीमचा 125 रननं पराभव झाला. वर्ल्ड कप जिंकण्याचं सचिन तेंडुलकरचं स्वप्न त्या दिवशी अपूर्ण राहिलं.

धोनीचा अजरामर सिक्स, सचिनचे अश्रू आणि संपूर्ण देशानं रात्रभर साजरी केली दिवाळी!

नाईटकडूनही चूक

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये (Women's World Cup 2022) इंग्लंडची कॅप्टन हेथर नाईटनं (Heather Knight) गांगुलीसारखीच चूक केली. इंग्लंडनं या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या तीन मॅच गमावल्यानंतर जबरदस्त कमबॅक केले. त्यांनी पुढच्या सर्व मॅच जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला. वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडची टीम ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देईल अशी अनेकांची अपेक्षा होती, पण नाईटनं एक मोठी चूक केली.

नाईटनं फायनलमध्ये टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. फायनलमध्ये आधी मुक्कपणे बॅटींग करून ऑस्ट्रेलियाला दबावात टाकण्याची संधी नाईटला होती, ती तिनं हातानं घालवली. ऑस्ट्रेलियन टीमनं (Australia Women Team) या संधीचा पूर्ण फायदा घेत 300 पेक्षा जास्त रन केले आहेत. इंग्लंडच्या कॅप्टनच्या चुकीमुळे 2003 वर्ल्ड कप फायनलची आठवण अनेकांना येत आहे. त्या फायनलमध्ये गांगुलीच्या चुकीमुळे सचिनसह संपूर्ण देशाचं स्वप्न भंग झालं होतं. यंदा ती वेळ इंग्लंडवर येणार आहे.

First published:

Tags: Cricket, England, Sachin tendulkar, Sourav ganguly