जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's World Cup : 140 रन केल्यानंतरही वेस्ट इंडिज विजयी, बांगलादेशचा केला थरारक पराभव

Women's World Cup : 140 रन केल्यानंतरही वेस्ट इंडिज विजयी, बांगलादेशचा केला थरारक पराभव

फोटो - @ICC

फोटो - @ICC

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमधील (Women’s World Cup 2022) आणखी एक मॅच थरारक झाली. शुक्रवारी झालेल्या स्पर्धेतील 17 व्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं 140 रनचे यशस्वी संरक्षण केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमधील (Women’s World Cup 2022) आणखी एक मॅच थरारक झाली. शुक्रवारी झालेल्या स्पर्धेतील 17 व्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं 140 रनचे यशस्वी संरक्षण केले.  वेस्ट इंडिजनं शेवटच्या ओव्हरमध्ये बांगलादेशचा 4 रननं (West Indies Women vs Bangladesh Women) पराभव केला.  बांगलादेशला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 8 रन हवे होते. स्टेफानी टेलरनं तिसऱ्या बॉलवर फरीहा तृष्णाला आऊट करत  वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेशची टीम 136 रनवर ऑल आऊट झाली. हेली मॅथ्यूज वेस्ट इंडिजच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने 10 ओव्हर्समध्ये फक्त 15 रन देत 4 घेतल्या. त्याचबरोबर कॅप्टन स्टेफानी टेलरनं 29 रन देत 3 विकेट्स घेतल्या. त्यापूर्वी वेस्ट इंडिजकडून शीमेन कॅम्पबेलनं सर्वात जास्त 53 रन काढले. हेली मॅथ्यूजनं 18 तर डिएंड्रा मार्टीननं 17 रनची खेळी केली.  बांगलादेशकडून सलमा खातून आणि नाहिदा अख्तर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ऋतू मोनी आणि जहानारा आलम यांनी 1-1 विकेट घेतली.

जाहिरात

वेस्ट इंडिजचा 5 सामन्यातील हा तिसरा विजय असून त्यांचे आता 6 पॉईंट्स झाले आहे. वेस्ट इंडिजनं पहिल्या दोन मॅच जिंकत दमदार सुरूवात केली होती. त्यानंतरच्या  दोन मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनी बांगलादेशचा पराभव करत सेमी फायनलला जाण्याचं आव्हान कायम ठेवलं आहे. इम्रान खान यांच्या एका दगडात 2 शिकार, बाबर आझमचं केलं कौतुक आणि…. तर दुसरिकडं बांगलादेशची  महिला टीम पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळत आहे. या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी पाकिस्तानचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यापाठोपाठ त्यांच्या बॉलर्सनी जोरदार कामगिरी करत वेस्ट इंडिजला फक्त 140 रनमध्ये रोखले होते. पण, बॅटर्सनं निराशा केल्यानं त्यांचा विजय हुकला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात