मुंबई, 18 मार्च : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझमनं (Babar Azam) ऑस्ट्रेलिया विरूद्ध कराची टेस्टमध्ये मॅरेथॉन इनिंग खेळत टीमचा पराभव टाळला. बाबरचं पहिलं द्विशतक 4 रननं हुकलं. त्यानं तब्बल 607 मिनिटं बॅटींग करत 196 रन केले. टेस्ट क्रिकेटच्या चौथ्या इनिंगमध्ये कोणत्याही कॅप्टननं केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या खेळीबद्दल जगभरातील क्रिकेट खेळाडू बाबरचं कौतुक करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनीही बाबरच्या खेळीचं कौतुक केलं आहे. इम्रान खान यांनी ट्विट करत म्हंटलं की, ‘ऑस्ट्रेलिया विरूद्ध जबरदस्त फाईटबॅक आणि दमदार कॅप्टन इनिंग खेळल्याबद्दल बाबर आझम आणि टीमचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. टीमनं विशेषत: मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी चांगला खेळ केला.’ इम्रान यांना ही मॅच पाहता आली नाही. त्याबद्दल त्यांनी पाकिस्तानातील विरोधी पक्षांना जबाबदार ठरवलं. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितलं की, ‘दुर्दैवानं मला ही मॅच बघता आली नाही. कारण मी मॅच फिक्सिंगच्या विरूद्ध दुसऱ्या एका आघाडीवर लढत आहे. त्या लढाईत माझ्या खेळाडूंना फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जात आहे.’
Unfortunately I could not watch this match as I am fighting on another front against match fixing where huge amounts of money are being used to lure my players!
— Imran Khan (@ImranKhanPTI) March 17, 2022
इम्रान खान सरकार सध्या अविश्वास ठरावाचा सामना करत आहे. त्यांच्या मित्र पक्षांनी सरकारची साथ सोडली आहे. विरोधी पक्षांचा भ्रष्टाचार सामान्य नागरिक विसरलेले नाही. संपूर्ण देशचा भ्रष्ट राजकीय पक्षांना नाही तर आपल्याला पाठिंबा आहे, असा दावा इम्रान यांनी केला. VIDEO : पांड्या बंधूंच्या विरहानं हार्दिकची वहिनी भावुक, इमोशनल पोस्टमधून मांडली भावना बाबरनं काढले 196 रन कराची टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये बाबरनं 425 बॉलमध्ये 196 रनची खेळी केली, त्याच्या या खेळीमध्ये 21 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 506 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने 7 आऊट 443 रन केले. बाबरने मॅचच्या चौथ्या इनिंगमध्ये कर्णधार म्हणून विक्रमाला गवसणी घातली. बाबर आता टेस्ट क्रिकेटच्या चौथ्या इनिंगमध्ये सर्वाधिक स्कोअर करणारा जगातला पहिला कर्णधार ठरला आहे.

)







