मुंबई, 10 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Women’s World Cup 2022) टीम इंडियाला नवी सुपरस्टार मिळाली आहे. भारतीय टीमची या स्पर्धेतील दुसरी मॅच सध्या सुरू आहे. या दोन्ही मॅचमध्ये पूजा वस्त्राकारनं (Pooja Vastrakar) टीम इंडियासाठी जोरदार कामगिरी केली आहे. पाकिस्तान विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये आक्रमक अर्धशतक झळकावणाऱ्या पूजानं न्यूझीलंडला बॉलिंग आणि फिल्डिंगचा तडाखा दिला. न्यूझीलंडच्या इनिंगमधील तिसऱ्याच ओव्हरमध्ये पूजाचा जलवा दिसला. पूजानं डायरेक्ट थ्रो करत न्यूझीलंडची ओपनर सूजी बेट्सला रन आऊट केले. न्यूझीलंडसाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर संपूर्ण इनिंगमध्ये यजमान टीमनं जम बसवलाय असं वाटत असतानाच पूजानं त्यांना हादरे दिले. पूजानं न्यूझीलंडची कॅप्टन सोफी डिव्हाईनला 35 रनवर आऊट केलं. या वर्ल्ड कपमधील पहिल्या मॅचमध्ये सोफीनं शतक झळकावलं होतं. त्यानंतर तिने डेथ ओव्हर्समध्येही प्रभावी मारा केला. पूजानं 10 ओव्हर्समध्ये फक्त 34 रन देत 4 विकेट्स घेतल्या.
1⃣0⃣ Overs
— BCCI Women (@BCCIWomen) March 10, 2022
3⃣4⃣ Runs
4⃣ Wickets
... and 1⃣ outstanding run-out!
How impressive was @Vastrakarp25 on the field against New Zealand! 👏 👏#TeamIndia | #CWC22 | #NZvIND
Scorecard ▶️ https://t.co/zZzFTtBxPb pic.twitter.com/C9yymR0CAR
वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या पूजाचा इथवरचा प्रवास सहज झालेला नाही. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसारखी (MS Dhoni) पूजा देखील लहाणपणी फुटबॉलपटू होती. फुटबॉलनंतर ती क्रिकेटकडे वळाली. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय टीममध्ये पूजानं जागा निश्चित केली आहे. ही जागा मिळवण्यासाठी लॉक डाऊनच्या काळात सर्व जग बंद असतानाही पूजा घराच्या गच्चीवर सराव करत होती. IND vs NZ : 8 ओव्हर्समध्ये पलटली बाजी, न्यूझीलंड विरूद्ध टीम इंडियाचं जोरदार कमबॅक! पूजानं घराच्या गच्चीवर क्रिकेटचं पिच बनवलं होतं. फिटनेसमध्ये सुधारणा करण्यासाठी सिलेंडर उचलून ती सराव करत असे. त्यामुळे टीम इंडियातील सिलेंडर वूमन म्हणून तिला ओळखले जाते. राजस्थान रॉयल्सचे फास्ट बॉलिंग एक्स्पर्ट स्टीफन जोन्सकडून पूजानं ऑनलाईन शिक्षण घेतलं आहे. जोन्स यांच्या सल्ल्यानुसार तिने लॉक डाऊनमध्ये वेळापत्रक आखले होते. पूजाच्या या कष्टाचं वर्ल्ड कप स्पर्धेत फळ मिळत आहे. टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूजाचा ऑल राऊंड खेळ महत्त्वाचा ठरणार आहे.