मुंबई, 17 मार्च : भारतीय महिला क्रिकेट टीमला (Team India Women) महिला वर्ल्ड कपमधील (Women's World Cup 2022) बुधवारच्या मॅचमध्ये पराभव सहन करावा लागला. इंग्लंड विरूद्धच्या या मॅचमध्ये (India Women vs England Women) भारतीय टीम 134 रनवर ऑल आऊट झाली होती. कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) फक्त 1 रन काढला. या वर्ल्ड कपमध्ये मितालीची बॅट शांत आहे. त्यामुळे तिच्यावर टीका होत आहे. मितालीच्या टीकाकारांना अनुभवी खेळाडू झुलन गोस्वामीनं (Jhulan Goswami) उत्तर दिलं आहे.
इंग्लंड विरूद्ध झालेल्या मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत झुलन म्हणाली, ' मिताली चांगल्या खेळीपासून फक्त एक इनिंग दूर आहे. तिने मागील सीरिजमध्येही चांगली बॅटींग केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये ती जबरदस्त फॉर्मपासून एक पावलाच्या अंतरावर आहे. दीप्ती शर्मा चांगला खेळ करत आहे. पाचव्या नंबरवर हरमनप्रीत कौर आहे. त्यामुळे मितालीचा फॉर्म हा फार मोठा मुद्दा आहे, असं मला वाटत नाही. ही फक्त एका वाईट दिवसाची गोष्ट आहे की आमची बॅटींग चालली नाही.
या प्रकरणाचं काही उत्तर नाही. ही एक प्रक्रिया आहे. कधी टॉप ऑर्डर चालत नाही तर कधी मिडल ऑर्डर फेल होते. याचपद्धतीनं खेळ पुढे जातो. आमच्यासाठी नक्कीच ही शिकण्याची गोष्ट आहे. प्रत्येक दिवशी आम्ही कोणत्या तरी प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. आम्ही नक्की सुधारणा करून दमदार पुनरागमन करू.' असं झुलननं यावेळी स्पष्ट केलं.
Women's World Cup : झुलन गोस्वामीनं रचला इतिहास, 'हा' विक्रम करणारी पहिली क्रिकेटपटू
मिताली वर्ल्ड कपमध्ये फेल
या वर्ल्ड कपमध्ये मिताली राजला आजवर एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. मितालीनं पाकिस्तान विरूद्ध 9 , न्यूझीलंड विरूद्ध 31 तर वेस्ट इंडिज विरूद्ध फक्त 1 रन केला होता. इंग्लंड विरूद्धही तिला दोन अंकी रन करण्यात अपयश आलं. टीम इंडियाची पुढील मॅच 19 मार्च रोजी ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणार आहे. ही मॅच भारतीय टीमसाठी खूप महत्त्वाची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Mithali raj, Team india