मुंबई, 16 मार्च : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील (Women’s World Cup 2022) बुधवारचा दिवस टीम इंडियासाठी खराब गेला. इंग्लंडनं भारतीय टीमचा (Team India Women vs England Women) 4 विकेट्सनं पराभव केला. भारतीय टीमचा 4 मॅचमधील हा दुसरा पराभव असून या पराभवामुळे टीमच्या रनरेटवरही परिणाम झाला आहे. या पराभवामध्येही अनुभवी बॉलर झुलन गोस्वामीनं (Jhulan Goswami) इतिहास रचला आहे. महिला वन-डे क्रिकेटच्या इतिहासात (Women ODI Cricket) 250 विकेट्स घेणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. झुलननं इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंटला आऊट करत हा टप्पा पूर्ण केला. झुलननं 199 वन-डेमध्ये हा रेकॉर्ड केला आहे. भारताच्या अनुभवी बॉलरनं 3.36 च्या इकोनॉमी रेटनं हा रेकॉर्ड पूर्ण केला आहे. एकाच मॅचमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी तिने 2 वेळा केली आहे. जानेवारी 2002 साली इंग्लंड विरूद्ध पदार्पण करणाऱ्या झुलननं 20 वर्षांनी हा पराक्रम केला आहे.
Milestone 🚨 - 250 wickets in ODIs for @JhulanG10 👏👏#CWC22 pic.twitter.com/g0f1CqT3Sl
— BCCI Women (@BCCIWomen) March 16, 2022
यापूर्वी झूलननं वेस्ट इंडिज विरूद्धच्या मॅचमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. झूलननं वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदला आऊट करत हा रेकॉर्ड केला. Women’s World Cup, IND vs ENG : टीम इंडियाचा स्पर्धेतील दुसरा पराभव, इंग्लंडला जीवदान वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या लिन फुल्सटॉनच्या नावावर होता. तिने 1982 ते 1988 या कालावधीमध्ये 20 मॅचमध्ये 39 विकेट्स घेतल्या होत्या. झूलन 2005 सालापासून वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत आहे. तिने 31 मॅचमध्ये हा रेकॉर्ड केला आहे.