जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's World Cup : इंग्लंडच्या कॅप्टननं घेतला एका हातानं थरारक कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क

Women's World Cup : इंग्लंडच्या कॅप्टननं घेतला एका हातानं थरारक कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क

Women's World Cup : इंग्लंडच्या कॅप्टननं घेतला एका हातानं थरारक कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क

गतविजेत्या इंग्लंडचं महिला वर्ल्ड कपमधील (Women’s World Cup 2022) आव्हान आणखी कायम आहे. न्यूझीलंड विरूद्ध रविवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडच्या कॅप्टननं एक भन्नाट कॅच घेतला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 मार्च : गतविजेत्या इंग्लंडचं महिला वर्ल्ड कपमधील (Women’s World Cup 2022) आव्हान आणखी कायम आहे. इंग्लंडनं रविवारी झालेल्या मॅचमध्ये यजमान न्यूझीलंडचा (England Women vs New Zealand Women) 1 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेली न्यूझीलंडची संपूर्ण टीम 203 रनवर ऑल आऊट झाली. इंग्लंडनं 204 रनचं आव्हान 9 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. इंग्लंडची कॅप्टन हेदर नाईटनं (Heather Knight) या मॅचमध्ये घेतलेला एक कॅच सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. न्यूझीलंडची बॅटर ताहूहूचा नाईटनं एका हातानं सुरेख कॅच घेतला. न्यूझीलंडच्या इनिंगमधील 39 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. सोफी एक्लेस्टोन ती ओव्हर टाकत होती. सोफीच्या ओव्हरमधील दुसरा बॉल ताहूहूनं हवेत टोलावला. इंग्लंडची कॅप्टन त्या बॉलपासून दूर होती. तिने हवेत झेपावत एका हातानं भन्नाट कॅच पकडला. हा कॅच पाहून सर्वच खेळाडू आणि प्रेक्षक थक्क झाले होते.

जाहिरात

204 रनचा पाठलाग करताना  इंग्लंडच्या 9 पैकी शेवटच्या 4 विकेट्स फक्त 11 बॉलमध्ये पडल्या. त्यामुळे मॅचमध्ये रंगत निर्माण झाली होती. इंग्लंडची अवस्था 5 आऊट 186 वरून 9 आऊट 196 अशी झाली होती. त्यावेळी त्यांच्यावर पराभवाचा धोका वाढला होता. पण, शेवटच्या जोडीनं निश्चयानं खेळ करत टीमला विजय मिळवू दिला. इंग्लंडकडून नॅट सिव्हरनं (Nat Sciver) सर्वात जास्त 61 रन काढले. तिनं 108 बॉलमध्ये हे रन केले. सिव्हरचं हे आजवरील सर्वात संथ अर्धशतक आहे. हेदर नाईटनं 42 रनची खेळी केली. IPL 2022 : धोनीची डोकेदुखी वाढली, स्टार खेळाडूला अजून भारतामध्ये प्रवेश नाही इंग्लंडचा पाच मॅचमधील हा दुसरा विजय असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे. तर सहा मॅचमध्ये 4 पराभव झाल्यानं यजमान न्यूझीलंडची टीम स्पर्धेतून जवळपास आऊट झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात