मुंबई, 20 मार्च : महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) अडचणी वाढल्या आहेत. टीमचा फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) सध्या अनफिट आहे. त्यामुळे तो सुरूवातीच्या काही मॅच खेळणार नाही. त्यातच टीमचा आणखी एका प्रमुख ऑल राऊंडरचे भारतामध्ये येणे लांबले आहे. चेन्नईची 26 मार्चला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरूद्ध पहिली मॅच आहे. या मॅचमध्ये हा खेळाडू खेळण्याची शक्यता कमी आहे. चेन्नईचा ऑल राऊंडर मोईन अली (Moeen Ali) अजून भारतामध्ये आलेला नाही. मोईननं मागील आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी करत सीएसकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याला सीएसकेनं ऑक्शनपूर्वी 8 कोटींमध्ये रिटेन केले होते. त्याला अजूनही भारतामध्ये येण्यासाठी व्हिसा मिळालेला नाही. ‘मोईन अली नियमित भारतामध्ये येतो. त्यामुळे त्याला व्हिसा मिळण्यात फार अडचण होणार नाही. त्याला व्हिसा मिळताच तो पुढील पहिल्या विमानानं भारतामध्ये येईल. चेन्नई सुपर किंग्सचे सराव शिबिर सध्या सुरतमध्ये सुरू आहे. त्या शिबिरात तो सहभागी होईल,‘अशी माहिती सीएसकेचे सीईओ काशी विश्वननाथन यांनी दिली आहे. All England Championship : लक्ष्य सेनची फायनलमध्ये धडक, 21 वर्षांनी इतिहासाच्या उंबरठ्यावर! मोईन अलीनं 28 फेब्रुवारी रोजी व्हिसासाठी अर्ज केला आहे. त्याने अर्ज करून आता 20 दिवस उलटलेत. तो भारतामध्ये नियमित प्रवास करतो. तरीही त्याला अद्याप त्याला अजून व्हिसा आणि प्रवासाबाबतचे पेपर्स देण्यात आलेले नाहीत. त्याला सोमवारपर्यंत आवश्यक कागदपत्रं मिळतील, अशी अपेक्षा विश्वनाथन यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







