मुंबई, 24 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup 2022) गतविजेत्या इंग्लंडनं मोठा विजय मिळवला आहे. इंग्लंडनं गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये (England Women vs Pakistan Women) पाकिस्तानचा 9 विकेट्सनं पराभव केला. या मोठ्या विजयानंतर इंग्लंडच्या सेमी फायनलच्या आशा वाढल्या आहेत. तर सध्या पॉईंट टेबलमध्ये तीन नंबरवर असलेल्या वेस्ट इंडिजचं (West Indies Women) आव्हान धोक्यात आलं आहे. इंग्लंड विरूद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानची संपूर्ण टीम फक्त 105 रनवर ऑल आऊट झाली. या मॅचमध्ये पाकिस्तानला संपूर्ण 50 ओव्हर्सही बॅटींग करता आली नाही. त्यांनी फक्त 41.3 ओव्हर्स बॅटींग केली. पाकिस्तान टीममधील 8 जणींना दोन अंकी रन करण्यातही अपयश आले. इंग्लंडनं 106 रनचं आव्हान फक्त 19.2 ओव्हर्समध्ये आणि 1 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयानंतर डॅनियल वॅटनं नाबाद 76 रनची खेळी केली. वॅटनं 68 बॉलमध्ये 11 फोरच्या मदतीनं ही खेळी केली. त्याचबरोबर कॅप्टन नाईटनं 36 बॉलमध्ये नाबाद 24 रनची खेळी केली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 87 रनची भागिदारी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून डायना बेगनं एकमेव विकेट मिळवली.
A huge win for England as they beat Pakistan by nine wickets and boost their net run-rate 🔥#CWC22 pic.twitter.com/Mgpk5qcDMI
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022
इंग्लंड जोमात इंग्लंडचे या विजयासह 6 पॉईंट्स झाले आहे. या वर्ल्ड कपमधील पहिल्या तीन मॅच गमावल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन टीमनं दमदार पुनरागमन करत आता चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टीम इंडियाचेही 6 मॅचनंतर 6 पॉईंट्स आहेत. पण, इंग्लंडचा नेट रनरेट जास्त असल्यानं ती टीम आता चौथ्या तर टीम इंडिया पाचव्या क्रमांकावर आहे. On This Day : युवराजची वर्ल्ड कपमध्ये अप्रतिम खेळी, टीम इंडियानं रोखला ऑस्ट्रेलियाचा विजयरथ वेस्ट इंडिज विरूद्ध दक्षिण आफ्रिका (West Indies vs South Africa) यांच्यातील मॅच पावसामुळे रद्द झाली. त्यामुळे दोन्ही टीमना एक-एक पॉईंट मिळाला. वेस्ट इंडिजच्या साखळी मॅचमधील सर्व मॅच संपल्या असून त्यांचे 7 मॅचनंतर 7 पॉईंट्स आहेत. तर भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी 6 पॉईंट्स असून त्यांची एक मॅच बाकी आहे. इंग्लंडची शेवटची मॅच बांगलादेश विरूद्ध तर भारताची शेवटची मॅच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आहे. भारत आणि इंग्लंड यांनी त्यांची शेवटची मॅच जिंकली तर दोन्ही टीमचे प्रत्येकी 8 पॉईंट्स होतील आणि या दोन्ही टीम सेमी फायनलसाठी पात्र होतील. तर वेस्ट इंडिजच्या टीमचं आव्हान मात्र संपुष्टात येईल.