मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

On This Day : युवराजची वर्ल्ड कपमध्ये अप्रतिम खेळी, टीम इंडियानं रोखला ऑस्ट्रेलियाचा विजयरथ

On This Day : युवराजची वर्ल्ड कपमध्ये अप्रतिम खेळी, टीम इंडियानं रोखला ऑस्ट्रेलियाचा विजयरथ

क्रिकेट फॅन्स आणि टीम इंडियासाठी (Team India) आजचा दिवस खास आहे. आजच्याच दिवशी 11 वर्षापूर्वी वर्ल्ड कपमधील (World Cup 2011) दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 मार्च :  क्रिकेट फॅन्स आणि टीम इंडियासाठी (Team India) आजचा दिवस खास आहे. आजच्याच दिवशी 11 वर्षापूर्वी वर्ल्ड कपमधील (World Cup 2011) दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) ऑल राऊंड खेळीमुळे भारतीय टीमनं सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. 5 विकेट्सनं विजय मिळवत मोठ्या दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

पॉन्टिंगचं शतक

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. शेन वॉटसन आणि ब्रॅड हॅडीन यांनी पहिल्या विकेटसाठी 40 रनची भागिदारी केली. भारताला अश्विननं पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं वॉटसनला आऊट केलं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रिकी पॉन्टिंगनं कॅप्टनला साजेसी खेळी केली. त्याने एक बाजू खंबीरपणे लावून धरली.

पॉन्टिंगनं 118 बॉलमध्ये सात फोर आणि एक सिक्सच्या मदतीनं 104 रनची खेळी केली. डेव्हिड हसीनं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत 26 बॉलमध्ये 38 रन केले. पण, भारतीय बॉलर्सनं निर्णायक क्षणी विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला मोठा स्कोअर करण्यापासून रोखले. ऑस्ट्रेलियानं 50 ओव्हर्समध्ये 6 आऊट 260 रन केले. भारताककडून युवराज, अश्विन आणि झहीर खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सचिन-सेहवागची आक्रमक सुरूवात

टीम इंडियाला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) आक्रमक सुरूवात करून दिली. या दोघांनी 44 बॉलमध्ये 49 रनची भागिदारी केली. सेहवाग आऊट झाल्यानंतर सचिननं  गौतम गंभीरसोबत 50  रनची महत्त्वाची भागिदारी केली. सचिननं 53 रन केले. त्याला शॉन टेटनं आऊट केलं. चौथ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीनं 24 रनची महत्त्वाची खेळी केली.

KKR चा Sheldon Jackson भारतीय की विदेशी? TV कार्यक्रमातील मोठ्या चुकीवर आलं स्पष्टीकरण

युवराजचं अर्धशतक

विराट कोहली आणि गौतम गंभीर पाठोपाठ आऊट झाले. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) ब्रेट ली नं आऊट करत टीम इंडियाला मोठा धक्का दिला. धोनी आऊट झाल्यानंतर युवराज-रैना या जोडीनं भारतीय इनिंग सावरली. युवराजनं 65 बॉलमध्ये 8 फोरच्या मदतीनं नाबाद 57 रन केले. तर रैनानं 28 बॉलमध्ये एक सिक्स आणि दोन फोरच्या जोरावर नाबाद 34 रनची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

First published:

Tags: Australia, Cricket news, On this Day, Team india, Yuvraj singh