मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्व काही करणार', रोहित शर्मानं दिला गंभीर इशारा!

'T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्व काही करणार', रोहित शर्मानं दिला गंभीर इशारा!

रोहीत शर्मा (Rohit Sharma) सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमचं नेतृत्त्व करत आहे. आयपीएल स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आलेली असताना रोहितचं सर्व लक्ष हे टी20 वर्ल्ड कपकडं (T20 World Cup 2021) आहे.

मुंबई, 30 सप्टेंबर :  रोहीत शर्मा (Rohit Sharma) सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमचं नेतृत्त्व करत आहे. आयपीएल स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आलेली असताना रोहितचं सर्व लक्ष हे टी20 वर्ल्ड कपकडं (T20 World Cup 2021) आहे. पुढील महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये हा वर्ल्ड कप होणार आहे.यामध्ये टीम इंडियाची पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.

रोहित शर्मानं 2007 साली जिंकलेल्या टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीचा ग्रुप फोटो शेअर करत, आगामी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वस्व झोकून देणार असल्याचं सांगितलं आहे. ’24 सप्टेंबर 2007 जोहान्सबर्ग. त्या दिवशी कोट्यावधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं. एक कमी अनुभवी, तरुण टीम इतिहास करेल याचा विचार कुणी केला होता? आता या घटनेला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही बरंच पुढं आलोय. तसंच अनेकदा इतिहास रचला आहे.

IPL 2021: विराटच्या डोक्यात फक्त T20 World Cup चा विचार, मॅचनंतर जिंकली सर्वांची मनं

आम्हाला अनेक धक्के सहन करावे लागले. पण, आम्ही हिंमत हरलेलो नाही. कारण आम्ही हार मानत नाही. या टी20 वर्ल्ड कपमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू. ही ट्रॉफी आमची आहे. टीम इंडिया, चला इथं काही तरी करुन दाखवूया.’ अशी पोस्ट रोहितनं केली आहे.

रोहित शर्मानं 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केले होते. त्यानं आजवर 111 टी20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 32.54 च्या सरासरीनं 2,864 रन केले आहेत. यामध्ये चार शतक आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे.

First published:

Tags: Cricket news, Rohit sharma, T20 world cup