मुंबई, 27 सप्टेंबर : क्रिकेट विश्वातील सर्वात खडतर टी20 लीग समजली जाणारी आयपीएल स्पर्धा (IPL 2021) सध्या यूएईमध्ये सुरू आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. त्यातच आरसीबी कॅप्टन म्हणून हे आपले शेवटचे आयपीएल असल्याचं विराटनं जाहीर केलं आहे. त्यामुळे प्रत्येक मॅचला विराटसाठी मोठं महत्त्व आहे. आयपीएल स्पर्धेची चुरस वाढलेली असतानाही विराटच्या मनात टी20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup 2021) विचार आहे. मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमधून हेच सिद्ध होत आहे.
मुंबई इंडियन्सचा बॅटर इशान किशनची (Ishan Kishan) टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे. या आक्रमक खेळाडूकडून भारतीय क्रिकेट टीमला मोठी आशा आहे. पण, इशान या आयपीएलमध्ये 'आऊट ऑफ फॉर्म' आहे. ज्या पिचवर आयपीएलनंतर लगेच टी 20 वर्ल्ड कप होणार आहे, तिथं इशान रन काढण्यासाठी झगडत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या मॅचमध्येही (MI vs RCB) इशान अपयशी ठरला. तो फक्त 9 रन काढून आऊट झाला. रोहित आणि डिकॉक ही ओपनिंग जोडी आऊट झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या इशानवर मोठी जबाबदारी होती. ती जबाबदारी पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला. या स्पर्धेत वारंवार अपयशी ठरणाऱ्या इशानची मॅच संपल्यानंतर विराटनं भेट घेतली. त्याच्याशी चर्चा करुन त्याला धीर दिला. या भेटीचे फोटो व्हायरल झाले असून विराटच्या या कृतीची क्रिकेट फॅन्सनी प्रशंसा केली आहे.
Leader @imvkohli ❤️ Talking to Ishan kishan when Ishan is going though a tough phase. pic.twitter.com/gXHZiL0CFw
— Yashvi (@ItsYashswiniR) September 26, 2021
Great to see Virat Kohli having a talk with Ishan Kishan after the match, with the T20 World Cup starting in a few weeks. His form is quite concerning as an ICT fan. #RCBvMI pic.twitter.com/O2Z9LLoZe9
— ᴷᴷᴿ (@AwaaraHoon) September 26, 2021
इशान किशनचा खराब फॉर्म हा मुंबई इंडियन्सच्या काळजीचा विषय आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा कॅप्टन असलेल्या विराटची चिंताही यामुळे वाढली आहे. त्यामुळे विराटनं मॅचनंतर तातडीनं इशानची भेट घेतली. मुंबई इंडियन्सची पुढची मॅच मंगळवारी पंजाब किंग्ज विरुद्ध आहे. आता विराटनं दिलेल्या कानमंत्राचा इशानवर सकारात्मक परिणाम होतो का ? हे त्याच दिवशी समजेल.
टीम इंडियात बंड! सिनिअर खेळाडूनं केली विराटची BCCI कडं तक्रार
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टनसी सोडणार असल्याचं विराटनं यापूर्वीच जाहीर केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Ishan kishan, Photo viral, Virat kohli