• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : विराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral

WTC Final : विराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral

इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) क्रिकेटचा ज्योतिष समजले जाते. आर्चरचे विराट कोहली (Virat Kohli) बद्दलचे जुने ट्विट सध्या व्हायरल (Viral) झाले आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 जून: इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) क्रिकेटचा ज्योतिष समजले जाते. याचे कारण म्हणजे त्याने केलेले जुने ट्विट्स भविष्यातील घडामोडींवर लागू होतात. अनेकदा त्याच्या जुन्या ट्विट्सनं खळबळ उडाली आहे. आर्चरला ज्योतिषविद्या येते असंही अनेकांचं मत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या निमित्ताने (WTC Final 2021) आर्चरचे विराट कोहली (Virat Kohli) बद्दलचे जुने ट्विट व्हायरल (Viral) झाले आहे. आर्चरनं हे ट्विट 31 मार्च 2006 या दिवशी केले आहे.  'आजचा दिवस तुझा असेल विराट' असे हे ट्विट आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा पहिला दिवस पावसानं वाया गेला. दुसऱ्या दिवशी विराट कोहली हा टीम इंडियाची ढाल बनला होता. दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा विराट 44 रनवर नाबाद होता. तो तिसऱ्या दिवशी मोठा स्कोअर करेल अशी अपेक्षा होती. पण तो तिसऱ्या दिवशी लगेच आऊट झाला. काईल जेमीसननं विराटला आऊट केले. पण त्यापूर्वी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आर्चरचं हे ट्विट व्हायरल झाले. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारतीय टीम 217 रनवर ऑल आऊट झाली.  काईल जेमिसनने या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या, तर बोल्ट आणि वॅगनरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. टीम साऊदीला एक विकेट घेण्यात यश आलं. WTC Final: चौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ? वाचा कसे आहे सोमवारचे हवामान तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे. दिवसाअखेरीस न्यूझीलंडचा स्कोअर 2 आऊट 101 एवढा झाला आहे. किवी टीम अजूनही 116 रनने पिछाडीवर आहे. दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये भारताला दोन विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडचे ओपनर टॉम लेथम (Tom Latham) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांनी टीमला 70 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. टॉम लेथम 30 रनवर तर डेवॉन कॉनवे 54 रनवर आऊट झाला. लेथमला अश्विनने आणि कॉनवेला इशांत शर्माने आऊट केलं.
  Published by:News18 Desk
  First published: