मुंबई, 14 जानेवारी : पावसामुळे प्रभावित झालेल्या आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (Ireland vs West Indies) वन-डे सामन्यात खळबळजनक निकालाची नोंद झाली आहे. या सामन्यात आयर्लंडनं यजमान वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सनं पराभव केला. डकवर्थ लुईस मेथडनं या सामन्याचा निकाल निश्चित झाला. आयर्लंडनं या विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्याचबरोबर ‘क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग’ (Cricket World Cup Super League) मधील 10 महत्त्वाचे पॉईंट्स देखील कमावले आहेत. वेस्ट इंडिजच्या पराभवाचं कारण त्यांची बॅटींग ठरली. आयर्लंडच्या बॉलिंग समोर विंडीजची टीम संपूर्ण 50 ओव्हर्स देखील खेळू शकली नाही. त्यांची टीम 48 ओव्हर्समध्ये 229 रनवर संपुष्टात आली. टीममधील टॉप ऑर्डरचे सर्व बॅटर फेल गेले. रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ या लोअर ऑर्डरमधील खेळाडूंनी वेगवान खेळी केल्याने वेस्ट इंडिजने 200 रनचा टप्पा ओलांडला.
It’s 1-1 in 🇯🇲 and all to play for in the series decider on Sunday. #MenInMaroon #WIvIRE pic.twitter.com/ManPiDsddH
— Windies Cricket (@windiescricket) January 13, 2022
आठव्या नंबरवर बॅटींगसाठी आलेल्या शेफर्डनं या सामन्यात वेस्ट इंडिजकडून एकमेव अर्धशतक झळकावले. त्याने 41 बॉलमध्ये 50 रन केले. त्याला 9 क्रमांकावरील ओडियन स्मिथने साथ दिली. स्मिथने फक्त 19 बॉलमध्ये 46 रन काढले. स्मिथच्या खेळीत 2 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 58 रनची भागिदारी केली. IND vs SA : विराटच्या खेळावर डिव्हिलियर्स खूश, मित्राची केली जोरदार प्रशंसा आयर्लंडच्या बॅटींगमध्ये पावसाचा अडथळा आला. पावसानंतर खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर डकवर्थ लुईस मेथडनुसार आयर्लंडला विजयासाठी 36 ओव्हर्समध्ये 168 रनचे टार्गेट देण्यात आले. ते त्यांनी 5 विकेट्सच्या मोबदल्यात 33 ओव्हर्समध्येच पूर्ण केले. आता या सीरिजमधील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी होणार आहे.