मुंबई, 14 जानेवारी : भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) केपटाऊन टेस्टमध्ये शतक झळकावण्यात अपयशी ठरला. पण, त्याने दोन्ही इनिंगमध्ये दबावात कशी बॅटींग केली पाहिजे, हे दाखवून दिले आहे. विराटने केपटाऊन टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 79 रन काढले. तर दुसऱ्या इनिंगमध्ये 143 बॉलचा सामना करत 29 रनची संयमी खेळी केली.
विराटचा खास मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) या खेळीबद्दल त्याची प्रशंसा केली आहे. विराट आणि डिव्हिलियर्स बराच काळ एकत्र खेळले आहेत. विराटला या पद्धतीने बॅटींग करताना पाहून खूप छान वाटले. हा या सीरिजमधील सर्वोत्तम प्रकार होता, असे मत डिव्हिलियर्सने व्यक्त केले.
'एका जबरदस्त सीरिजचा सर्वोत्तम क्लायमॅक्स. हे पाहताना खूप छान वाटले. विराट महत्त्वाचा आहे. ' असे ट्विट डिव्हिलियर्सने केले. विराटने पहिल्या इनिंगमध्ये 201 बॉलमध्ये 12 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 79 रन काढले. तो त्या इनिंगमधील सर्वात जास्त रन करणारा बॅटर होता. विराटच्या खेळीमुळेच टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 223 रनपर्यंत मजल मारली.
Fantastic climax to a brilliant series here! Lovely to watch. Kohli is key#SAvIND #ultimateformofthegame
— AB de Villiers (@ABdeVilliers17) January 13, 2022
टीम इंडियाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये ऋषभ पंतनं (Rishabh Pant) नाबाद शतक झळकावले. पंतच्या नाबाद शतकामुळे भारतीय टीम 198 रनवर ऑल आऊट झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 रनचं आव्हान मिळाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 2 आऊट 101 एवढा झाला आहे, त्यांना विजयासाठी आणखी 111 रनची गरज आहे. दिवसाच्या शेवटच्या बॉलला बुमराहने धोकादायक डीन एल्गारची (Dean Elgar) 30 रनवर विकेट घेतली, यानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्याआधी मोहम्मद शमीने एडन मार्करमला 16 रनवर आऊट केलं होतं.
IND vs SA : खणखणीत शतकानंतरही पंतने केली मोठी चूक, टीम इंडियाला पडणार महागात!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, South africa, Team india, Virat kohli