रवीचे वडील CRPF मध्ये आहेत. 29 ऑक्टोबर 2003 रोजी कोलकातामध्ये त्याचा जन्म झाला. त्यानंतर त्याचे कुटुंबीय उत्तर प्रदेशमध्ये स्थायिक झाले. रवी तिथंच क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. भारद्वाज सरांच्या मार्गदर्शनाखाली कोचिंग घेतल्यानंतर रवीनं क्रिकेटमधील कारकिर्द घडवण्यासाठी कोलकातामध्ये जाण्याचं ठरवलं. (ACC Twitter)
रवी गेल्या काही कालावधीपासून टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि अंडर 19 टीमचे देवांग गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग घेत आहे. या ट्रेनिंगचा रवीला मोठा फायदा झाला आहे. तो बॉल आतमध्ये आणि बाहेर दोन्ही कडे स्विंग करू शकतो. त्याच्या उंचीमुळे त्याला बॉलला अधिक उंची देता येते. तसेच तो नव्या बॉलनं विकेट काढण्यात एक्स्पर्ट आहे. (BCCI Twitter)
झहीर खान, आशिष नेहरा, इराफान पठाण यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा लेफ्ट आर्म फास्ट बॉलरचा शोध संपलेला नाही. 2016 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपनंतर खलिल अहमदनं थोडी आशा दाखवली होती. पण, नंतर तो मागे पडला. टी. नटराजननं चांगली सुरूवात केली. पण, दुखापतीमुळे तो देखील बराच काळापासून बाहेर आहे. त्यामुळे रवी कुमार डावखुऱ्या फास्ट बॉलरचा भारताचा शोध समाप्त करणार का? हा खरा प्रश्न आहे. (T Natrajan Instagram)