जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / बेन स्टोक्सनं केली वेस्ट इंडिजची धुलाई, 11 फोर आणि 6 सिक्ससह झळकावलं शतक

बेन स्टोक्सनं केली वेस्ट इंडिजची धुलाई, 11 फोर आणि 6 सिक्ससह झळकावलं शतक

बेन स्टोक्सनं केली वेस्ट इंडिजची धुलाई, 11 फोर आणि 6 सिक्ससह झळकावलं शतक

इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्यात सध्या बार्बाडोसमध्ये दुसरी टेस्ट सुरू आहे. या टेस्टचा दुसरा दिवस इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं (Ben Stokes) गाजवला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मार्च : इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्यात सध्या बार्बाडोसमध्ये दुसरी टेस्ट सुरू आहे. या टेस्टचा दुसरा दिवस इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं (Ben Stokes) गाजवला. स्टोक्सनं वेस्ट इंडिजच्या बॉलर्सची जोरदार धुलाई करत आक्रमक शतक झळकावले. स्टोक्सनं फक्त 128 बॉलमध्ये 120 रन काढले. यामध्ये त्यानं 11 फोर आणि 6 सिक्स लगावले. स्टोक्सच्या या शतकाच्या जोरावर इंग्लंजचा कॅप्टन जो रूटनं (Joe Root) 9 आऊट 507 या विशाल धावसंख्येवर पहिली इनिंग घोषित केली. जो रूटनंही या मॅचमध्ये चांगली बॅटींग केली. त्याने 153 रन केले. लॉरेन्सला मात्र शतक झळकावता आले नाही. त्याला 91 रनवर होल्डरनं आऊट केलं. पहिल्या टेस्टमध्ये शतक झळकावणारा जॉनी बेअरस्टो 20 रन काढून आऊट झाला. विकेट किपर बेन फोक्सनं 33 तर ख्रिस वोक्सनं 41 रनची खेळी केली.

जाहिरात

वेस्ट इंडिजनं 507 रनच्या धावसंख्येला सावध उत्तर दिलं आहे. यजमान टीमनं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 1 आऊट 71 रन केले. खेळ संपला तेव्हा कॅप्टन क्रेग ब्रेथवेट 28 तर शेमराह ब्रूक्स 31 रन काढून खेळत होते. वेस्ट इंडिजचा ओपनर जॉन कॅम्पबेल फक्त 4 रन काढून आऊट झाले. हरभजनसह ‘या’ क्रिकेटपटूंनी खेळली राजकीय इनिंग, कुणी पास तर काही फेल! वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील तीन टेस्ट सीरिजमधील पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. या सीरिजमधील तिसरी आणि शेवटची टेस्ट 24 मार्चपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियात झालेली अ‍ॅशेस सीरिज गमावल्यानंतर इंग्लंड पहिल्यांदाच टेस्ट सीरिज खेळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात