मुंबई, 29 जानेवारी: आयपीएल 2022 साठी मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) पुढच्या महिन्यात होणार आहे. या ऑक्शनसाठी 318 विदेशी खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या खेळाडूंपैकी एका नावाची त्यानं नोंदणी केल्यापासूनची चर्चा आहे. त्याचं नाव मिक्यो दोर्जी (Mikyo Dorji) असून तो भूतानचा क्रिकेटपटू आहे. आयपीएल ऑक्शनसाठी नोंदणी केलेला तो भूतानचा पहिला क्रिकेटपटू बनला आहे.
दोर्जी 22 वर्षांचा असून ऑलराऊंडर आहे. त्याने 2018 साली मलेशिया विरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विदेशातील क्रिकेट लीगमध्ये खेळलेला तो पहिला क्रिकेटपटू आहे. तो यापूर्वी नेपाळमधील एव्हरेस्ट प्रीमियर लीगमध्ये खेळला आहे. तसंच 2018 आणि 2019 साली त्याने चेन्नईतील एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे, असं वृत्त 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'नं दिलं आहे.
धोनीशी खास कनेक्शन
दोर्जीची भारत दौऱ्यात एकदा टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीशी (MS Dhoni) भेट झाली होती. त्यावेळी 'कोणतंही फळ मिळालं तरी कठोर परिश्रम कर,' असा सल्ला धोनीनं त्याला दिला. धोनीच्या या सल्ल्यानंतर त्याचं आयुष्य बदललं. त्यानं अधिक गांभिर्यानं क्रिकेटकडे लक्ष देण्यास सुरूवात केली.
U19 WC, IND vs BAN : टीम इंडियाला आज वचपा काढण्याची संधी, पाहा कुठे पाहाणार Live?
दोर्जीनं दार्जिलिंगमधील सेंट जोसेफ शाळेत शिक्षण घेतलं आहे. त्याला आयपीएल ऑक्शनमध्ये कुणी खरेदी केले तर तो नवा इतिहास निर्माण करेल. पण, तसं प्रत्यक्षात होण्याची शक्यता कमी आहे. पण, तो फास्ट बॉलिंग ऑल राऊंडर आहे. या खेळाडूंना आयपीएलमध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे त्याचं नशिब उजळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhutan, Cricket, Cricket news, International, Ipl 2022, Ipl 2022 auction, MS Dhoni, Sports