मुंबई, 29 जानेवारी: भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात अंडर 19 वर्ल्ड कप (U19 World Cup 2022) मधील चौथी क्वार्टर फायनल आज (शनिवारी) होत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाला कोरोनाचा फटका बसला होता. मागील दोन सामन्यांमध्ये भारतीय टीमकडे फक्त 11 खेळाडू उपलब्ध होते. त्यानंतरही दमदार कामगिरी करत टीमनं सलग तीन विजयांसह क्वार्टर फायनल गाठली आहे. बांगालदेश विरूद्धच्या मॅचपूर्वी कॅप्टन यश ढूलसह (Yash Dhull) पाच खेळाडू कोरोनामधून बरे होऊन परतल्यानं टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. मात्र त्याचवेळी निशांत सिंधूला कोरोनाची लागण झाल्यानं तो हा सामना खेळणार नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशनं भारतीय टीमचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी टीम इंडियाला या सामन्यात आहे. या सामन्यात विजय मिळवल्या भारताची सेमी फायनलमधील लढत ऑस्ट्रेलिया विरूद्ध होईल. भारत विरुद्ध बांगलादेश सामना किती वाजता सुरू होणार? भारत विरुद्ध बांगलादेश सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. भारत विरुद्ध बांगलादेश सामना कुठे होईल? भारत विरूद्ध बांगलादेश सामना अँटीगामध्ये होणार आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येईल? भारत-बांगलादेश यांच्यातील लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहाता येऊ शकेल. भारत-बांगलादेश सामन्याचे Live Streaming कुठे पाहता येईल? भारत-बांगलादेश सामन्याचे Live Streaming हॉटस्टारवर पाहता येईल. IND vs WI: भारत दौऱ्यापूर्वी West Indies टीममध्ये फूट, कॅप्टन पोलार्डचा निर्णय वादात भारतीय टीम : यश ढूल (कॅप्टन), शेख राशिद (उप कप्तान), आराध्य यादव, दिनेश बाना, राज बावा, अनिश्वर गौतम, राजवर्धन हंगरगेकर, हरनूर सिंह, मानव पारख, विक्की ओस्तवाल, अंगकृष रघुवंशी, रवी कुमार, गर्व सांगवान, सिद्धार्थ यादव, निशांत सिंधू, कौशल तांबे आणि वासू वत्स.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.