मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तान दौऱ्यातील वेस्ट इंडिज टीमवर कोरोना अटॅक, वाचा सीरिज होणार का?

पाकिस्तान दौऱ्यातील वेस्ट इंडिज टीमवर कोरोना अटॅक, वाचा सीरिज होणार का?

वेस्ट इंडिजची टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (West Indies tour of Pakistan) आहे. या सीरिजमधील पहिली मॅच होण्यापूर्वीच वेस्ट इंडिज टीम संकटात सापडली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 12 डिसेंबर : वेस्ट इंडिजची टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (West Indies tour of Pakistan) आहे. या सीरिजमधील पहिली मॅच होण्यापूर्वीच वेस्ट इंडिज टीम संकटात सापडली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीममधील 4 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 3 खेळाडूंचा समावेश आहे. दोन्ही देशांमधील (West Indies vs Pakistan) पहिला टी20 सामना सोमवारी होणार आहे. त्यापूर्वीच या खेळाडूंना कोरोना झाल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार फास्ट बॉलर शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell), ऑल राऊंडर रोस्टन चेज (Rosten Chase) आणि काईल मेयर्स (Kyle Mayers) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर गैर कोचिंग स्टाफमधील एक सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. कराचीमध्ये झालेल्या कोरोना चाचणीत हे सर्व जण पॉझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे या चौघांचेही लसीकरण झाले आहे. सीरिज होणार का? वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 'आमची टीम कराचीमध्ये दाखल झाल्यानंतर कोरोना प्रोटोकॉलनुसार घेण्यात आलेल्या टेस्टमध्ये हे चार सदस्य पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व खेळाडू आणि स्टाफ हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये होता तेव्हा हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे आमच्या तयारीला धक्का बसला आहे. तरीही आम्ही हा दौरा सुरू ठेवणार आहोत. पाकिस्तानात जाण्यापूर्वी सर्व खेळाडू निगेटीव्ह होते. तसेच कराचीतही करण्यात आलेल्या दोन टेस्टमध्ये अन्य सर्व  खेळाडू निगेटिव्ह आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी (PCB) ही सीरिज होणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड टीमनं पाकिस्तानचा दौरा रद्द केल्याने पीसीबीला मोठा धक्का बसला होता. 3 सामन्यांच्या या टी20 सीरिजधील पहिला सामना 13, दुसरा 14 तर शेवटचा 16 डिसेंबरला खेळवला जाईल. सर्व सामने कराचीमधील नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्येच होणार आहेत. पाकिस्तान दौऱ्यातून पोलार्डची माघार, 'हे' 2 जण असणार वेस्ट इंडिजचे कॅप्टन
First published:

Tags: Covid-19, Cricket news, Pakistan, West indies

पुढील बातम्या