मुंबई, 5 डिसेंबर : पाकिस्तानचा दौरा सुरू होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजचा व्हाईट बॉल क्रिकेटमधील कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने या दौऱ्यातून माघार घेतली आहे. पोलार्डला टी20 वर्ल्ड कपपूर्वी दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप बरा झालेला नाही. वेस्ट इंडिजच्या निवड समितीनं पोलार्डच्या जागी डेवॉन थॉमसचा वन-डे टीममध्ये समावेश केला आहे. पोलार्डवर आता त्रिनिदादमध्येच उपचार होणार आहेत. कायरन पोलार्डनं माघार घेतल्यानं वेस्ट इंडिजचे दोन कॅप्टन असतील. टी20 मध्ये टीमचं नेतृत्त्व निकोलस पूरन करणार आहे. तर वन-डेमध्ये शाही होपकडे टीमची जबाबदारी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजने यावर्षी झालेल्या टी20 सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा पराभव केला होता. त्या सीरिजमधील काही मॅचमध्ये पोलार्डच्या अनुपस्थितीमध्ये पूरननं कॅप्टनसी सांभाळली होती. तर शाही होपला पहिल्यांदाच वन-डे टीमचा कॅप्टन करण्यात आले आहे. वन-डे टीमचा व्हाईस कॅप्टन निकोलस पूरन तर टी20 टीमचा शाही होप व्हाईस कॅप्टन असेल. वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक वेस्ट इंडिजची टीम 3 टी20 आणि 3 वन-डे मॅचसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. 13, 14 आणि 16 डिसेंबर दरम्यान वन-डे सीरिज होणार आहे. या सीरिजमधील सर्व सामने कराची नॅशनल स्टेडियममध्ये होतील. 2023 साली भारतामध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत रँकिंगमधील पहिल्या 7 टीम थेट पात्र होणार आहेत. वेस्ट इंडिजची टीम सध्या 8 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ही सीरिज जिंकून वर्ल्ड कप स्पर्धेत थेट खेळण्याची दावेदारी भक्कम करण्याचा वेस्ट इंडिजचा प्रयत्न असेल. IND vs NZ: 12 पैकी 12! एजाझ पटेलची पुन्हा कमाल, टीम इंडियाला दुसऱ्या इनिंगमध्येही दिले धक्के वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी20 सामने देखील कराचीमध्येच खेळले जाणार आहेत. 18, 20 आणि 22 डिसेंबर रोजी हे सामने होतील. टी20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजची कामगिरी खराब झाली. त्यांचे आव्हान सेमी फायनलपूर्वी संपुष्टात आले. आता पाकिस्तानला पराभव करत नवी सुरुवात करण्याची वेस्ट इंडिजला संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.