• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • भारत-इंग्लंड यांची पहिली वन-डे आज, 'लेडी सेहवाग'वर टीम इंडियाची भिस्त

भारत-इंग्लंड यांची पहिली वन-डे आज, 'लेडी सेहवाग'वर टीम इंडियाची भिस्त

भारत विरुद्ध इंग्लंड (IND W vs ENG W) यांच्यातील वन-डे मालिकेला रविवारी सुरुवात होत आहे. या मालिकेत लेडी विरेंद्र सेहवाग (Lady Virender Sehwag) म्हणून ओळखली जाणारी आक्रमक ओपनर शफाली वर्मावर (Shafali Verma) टीम इंडियाची भिस्त आहे.

 • Share this:
  ब्रिस्टल, 27 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (IND W vs ENG W) यांच्यातील वन-डे मालिकेला रविवारी सुरुवात होत आहे. या मालिकेतील एकमेव टेस्ट टीम इंडियानं जिद्दीनं खेळ करत ड्रॉ केली होती. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेली टीम वन-डे मालिकेत जोरदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. लेडी विरेंद्र सेहवाग (Lady Virender Sehwag) म्हणून ओळखली जाणारी  आक्रमक ओपनर शफाली वर्मा (Shafali Verma) टी20 आणि टेस्टमधील जोरदार कामगिरीनंतर वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. या मालिकेत शफालीच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष असेल. शफाली वर्मानं 22 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. 17 वर्षाच्या बॅटरनं आक्रमक खेळामुळे क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वन-डे मालिकेत शफालीचा टीममध्ये समावेश करण्यात आला नव्हता. त्या मालिकेत भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर शफालीला वन-डे टीममध्ये पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये शफालीनं 96 आणि 63 रन काढले होते. भारतीय टीममध्ये स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Haramanpreet Kaur) सोडून कुणी प्रभावशाली बॅटर नाही. त्यामुळे शफाली वर्माचा फॉर्म टीमसाठी निर्णायक आहे. शफालीला कॅप्टन मिताली राज आणि पूनम राऊत यांचीही साथ मिळाली तर या मॅचमध्ये टीम इंडियाला विजय मिळण्याची शक्यता आहे. एकमेव टेस्ट मॅचमध्ये शफलीनं इंग्लंडच्या सर्वच बॉलर्सची धुलाई केली होती. त्यामुळे आता वन-डे मालिकेत त्यांची टीम नव्या योजनेसह मैदानात उतरणार आहे. इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध कट! अंपायरमुळे शतक न झाल्याचा कॅप्टनचा मोठा आरोप भारताची टीम :  मिताली राज (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, पूनम राऊत, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, तानिया भाटीया (विकेटकिपर), स्नेह राणा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, जेमिमा रोड्रिग्स, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकार, एकता बिष्ट, राधा यादव, पूनम यादव, प्रिया पूनीया आणि इंद्राणी रॉय (विकेटकिपर)
  Published by:News18 Desk
  First published: