मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

युवराज सिंह बनला 'सिक्सर किंग', ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये लगावले होते 6,6,6,6,6,6 पाहा VIDEO

युवराज सिंह बनला 'सिक्सर किंग', ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये लगावले होते 6,6,6,6,6,6 पाहा VIDEO

कोणताही भारतीय क्रिकेट फॅन आजचा दिवस कधीही विसरु शकणार नाही. आजच्याच दिवशी 2007 साली,  (On This Day, 19 September 2007) भारतीय खेळाडूनं न भुतो असा पराक्रम केला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 सप्टेंबर : कोणताही भारतीय क्रिकेट फॅन आजचा दिवस कधीही विसरु शकणार नाही. आजच्याच दिवशी 2007 साली,  (On This Day, 19 September 2007) भारतीय खेळाडूनं न भुतो असा पराक्रम केला. टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) यानं स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावले. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा युवराज हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला.  या फटकेबाजीमुळेच युवराजला 'सिक्सर किंग' हे नाव मिळाले.

दक्षिण आफ्रिकेत दरबनमध्ये झालेल्या त्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. युवराज सिंह बॅटींगला आला तेव्हा 3 विकेट्स पडल्या होत्या. युवराज आणि धोनी ही जोडी मैदानात असताना त्यानं हा पराक्रम केला.

T20 World Cup: पाकिस्तानपूर्वी 2 दिग्गज टीमशी भिडणार टीम इंडिया, पाहा वेळापत्रक

स्टुअर्ट ब्रॉडच्या 19 व्या ओव्हरमध्ये युवराजनं ही फटकेबाजी केली. त्यानं पहिल्या बॉलवर काऊ कॉर्नच्या दिशेनं सिक्स लगावला. दुसरा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तिसरा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरुन मारत त्यानं सिक्स लगावला. तो इथंच थांबला नाही, त्यानं 6 बॉलवर सलग 6 सिक्स लगावले.

" isDesktop="true" id="606318" >

युवराजचा विक्रम आजही कायम

युवराज सिंहनं या मॅचमध्ये फक्त 12 बॉलमध्ये अर्धशतक लगावले. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक आहे. त्याचा हा विक्रम आज 14 वर्षांनंतरही कायम आहे. त्यानं 16 बॉलमध्ये 3 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीनं 58 रन काढले. या मॅचमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 362.50 इतका होता. त्याच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियानं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 218 रन काढले.

रोहित इतिहास घडवण्यापासून 3 पावलं दूर, धोनी-कोहली जवळपासही नाहीत

इंग्लंडला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 200 रन केले. भारताने हा सामना 18 रननं जिंकला. 'मॅन ऑफ द मॅच'चा मानकरी अर्थातच युवराज ठरला.

First published:

Tags: Cricket news, On this Day, T20 world cup, Yuvraj singh