मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : 'प्रेक्षक रोहितचा खेळ पाहण्यासाठी येतात, तो खेळत नसेल तर मी...' नाराज सेहवागची मोठी प्रतिक्रिया

IND vs ENG : 'प्रेक्षक रोहितचा खेळ पाहण्यासाठी येतात, तो खेळत नसेल तर मी...' नाराज सेहवागची मोठी प्रतिक्रिया

भारताचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती दिली. विराटच्या या निर्णयावर विरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे.

  • Published by:  News18 Desk

अहमदाबाद, 13 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात झालेल्या पहिल्या टी20 मध्ये भारतीय टीमचा (Team India) 8 विकेटने पराभव झाला. टेस्ट सीरिज 3-1 ने जिंकणाऱ्या टीम इंडियाला पहिल्या टी20 मध्ये कोणताही प्रभाव टाकता आला नाही. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचा अपवाद वगळता एकही भारतीय खेळाडू पहिल्या मॅचमध्ये चालला नाही.

भारताचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने या मॅचमध्ये प्रयोग करत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती दिली. वास्तविक मॅचच्या आदल्या दिवशी रोहित आणि केएल राहुल हे सलामीचे बॅट्समन असतील असं विराटने सांगितलं होतं. तरीही पहिल्या मॅचमध्ये रोहितला विश्रांती देऊन शिखर धवनला खेळवण्यात आलं.

विराट कोहलीच्या या निर्णयावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि आक्रमक सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'क्रिकबझ' शी बोलताना सेहवागनं ही नाराजी व्यक्त केली आहे. 'रोहित शर्मा सुरुवातीच्या मॅच खेळणार नाही, असं विराटने सांगितलं आहे. भारताने पहिल्या दोन मॅच गमावल्या तर काय रणणिती बनेल? पराभावाने टीमला मोठा फरक पडतो. मी कॅप्टन असतो तर नक्कीच सर्वोत्तम 11 जणांना खेळवले असतं,' असं सेहवागने सांगितलं.

'प्रेक्षक रोहितसाठी येतात'

'रोहित शर्मा उलब्ध असेल तर तो नक्की खेळला पाहिजे. प्रेक्षक देखील रोहित सारख्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी येतात. मी देखील रोहित शर्माचा फॅन आहे. तो खेळत नसेल तर माझा टीव्ही बंद असेल. मॅच पाहावी वाटणार नाही,' अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली आहे.

विराट कोहली शून्यावर आऊट होताच त्याला पोलिसांनी केलं ट्रोल, Tweet Viral )

रोहितच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीमची सुरूवात खराब झाली. केएल राहुलला एक रनवर जोफ्रा आर्चरने बोल्ड केलं, तर कर्णधार विराट कोहली पाच बॉल खेळून शून्य रनवर आऊट झाला. शिखर धवन यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. 4 रन करून तो आऊट झाला, त्यामुळे भारताच्या सुरूवातीच्या तीन बॅट्समनना फक्त 5 रन करता आले. याआधी ऑक्टोबर 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या टॉप-3 ला फक्त 10 रन करता आल्या होत्या

First published:

Tags: Cricket, India vs england, Rohit sharma, Sports, Virender sehwag